Lok Sabha Election : मतमोजणीआधीच भाजपने सूरत जिंकलं; देशातील पहिला निकाल भाजपाच्या खात्यात
Lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी (Lok Sabha Election Result) सुरू झाली आहे. मात्र याआधीच भाजपला गुडन्यूज मिळाली आहे. गुजरातमधील सूरत लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार मुकेश दलाल यांचा बिनविरोध विजय झाला आहे. देशातील ही पहिली जागा एक महिन्याआधीच भाजपाच्या खात्यात आली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवार निलेश कुंभाणी यांनी उमेदवारी अर्ज बाद झाल्याने निवडणूक रिंगणात उमेदवारच राहिला नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने मनोज दलाल यांचा बिनविरोध विजय झाल्याचे घोषित केले.
‘सूरत’, ‘इंदूर’नंतर ‘पुरी’तही काँग्रेसवर नामुष्की; पैसे नाहीत म्हणून उमेदवाराची माघार
काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभानी यांच्या निवडणूक अर्जाबाबत भाजपच्या उमेदवाराकडून आक्षेप घेण्यात आला होता. या आक्षेपावर काल सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान, काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला. काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज अवैध झाल्यानंतर भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची बहुजन समाज पार्टीचे उमेदवार प्यारेलाल यांच्याशी थेट लढत होणार होती. मात्र, आज अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी बसपाचे उमेदवार प्यारेलाल यांनी आपला फॉर्म मागे घेतल्याने या जागेवर भाजपचे उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांंनी घोषित केले.
Loksabha Election 2024 : मतदानाआधीच भाजपने खातं उघडलं; सुरत मतदारसंघात ‘कमळ’ फुललं..
सुरत लोकसभा जागेसाठी काँग्रेस उमेदवाराचा अर्ज रद्द झाल्याने एकूण 9 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी अपक्षांसह 7 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. आता एकच उमेदवार उरला होता. बसपाचे हे उमेदवार प्यारेलाल सुरत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यानंतर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. भाजप उमेदवाराच्या विरोधात प्रतिस्पर्धी उमेदवारच राहिली नाही. अशा स्थितीत भाजपचा उमेदवार बिनविरोध घोषित करण्यात आला.
भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांचे निवडणूक प्रतिनिधी दिनेश जोधानी यांनी फॉर्म पडताळणीवेळी काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांच्या फॉर्मबाबत आक्षेप घेतला होता आणि काँग्रेस उमेदवाराचा कोणीही प्रस्तावक नसल्याची माहिती असल्याचे सांगितले होते. काँग्रेस उमेदवाराचे निवडणूक एजंट फिसिक कोल्डी यांनी याबाबत माहिती दिली होती.
आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्याआधीच ही गुडन्यूज भाजपला मिळाली आहे. अशा प्रकारे भाजपने निवडणुकीत विजयाने सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दुपारपर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.