Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election 2024) मध्य प्रदेशात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुरेश पचौरी (Suresh Pachauri) आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सुरेश पचौरी हे चार वेळा खासदार आणि काँग्रेस सरकारमध्ये अनेक मंत्रालयांचे केंद्रीय राज्यमंत्री राहिले आहेत.
सुरेश पचौरी यांनी 1972 मध्ये युवक काँग्रेस कार्यकर्ता म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. 1984 मध्ये ते प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. ते 1984 मध्येच राज्यसभेवर निवडून आले आणि 1990, 1996 आणि 2002 मध्ये पुन्हा निवडून संधी देण्यात आली होती. केंद्रीय संरक्षण, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री म्हणून काम केले आहे.
महायुतीचे दिल्लीत जागावाटप फायनल; तब्बल अडीच तास बैठक, शिंदे-पवार एकाच विमानातून मुंबईकडे
दोनदा लढले आणि हरले
सुरेश पचौरी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत केवळ दोनदा निवडणूक लढवली होती. 1999 मध्ये त्यांनी भोपाळ लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमा भारती यांना आव्हान दिले होते. त्यावेळी 1.6 लाखांहून अधिक मतांनी त्यांचा पराभव झाला होता. याशिवाय त्यांनी 2013 ची विधानसभा निवडणूक भोजपूरमधून शिवराज सिंह चौहान सरकारमधील मंत्री आणि दिवंगत मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांचे पुतणे सुरेंद्र पटवा यांच्याविरुद्ध लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता.
बारामतीमध्ये नणंद -भावजयी सामना, पण त्यापूर्वीच सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार यांची गळाभेट