Download App

लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यात ६० टक्के मतदान; आठ हजार उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद

काल लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यासाठी रात्री ८ वाजेपर्यंत सुमारे ६० टक्के मतदानाची नोंद झाली. यामध्ये आठ राज्यांत ५७ जागांवर मतदान झालं.

Lok Sabha Elections 2024 Last Phase Voting Percentage : लोकसभा निवडणूक सात टप्प्यांमध्ये पार पडली. त्यातील शेवटचा टप्पा काल झाला. यामध्ये काल शनिवारी रात्री ८ वाजेपर्यंत सुमारे ६० टक्के मतदानाची प्राथमिक नोंद झाली. या टप्प्यासाठी आठ राज्यांतील वाराणसीसह ५७ जागांवर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ४ जूनपर्यंत सुमारे आठ हजार ३६० उमेदवारांचं भवितव्य मतयंत्रामध्ये बंद झालं.

या राज्यांचा समावेश

गेल्या शनिवारी (२५ मे)रोजी सहाव्या टप्प्यात ६३.३६ टक्के मतदान झालं होतं. त्यापूर्वी पाचव्या टप्पा २० मे रोजी झाला होता. त्यामध्ये  ६२.२ टक्के इतकंच मतदान झालं आहे. शेवटच्या टप्प्यात पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड आणि चंडीगडसह आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत मतदान झालं. पंजाबमधील १३, उत्तर प्रदेश १३, पश्चिम बंगाल नऊ, बिहार आठ, ओडिशा सहा, हिमाचल प्रदेश चार, झारखंड तीन आणि चंडीगडच्या जागेसाठी मतदान पार पडलं.

सर्वाधिक मतदान

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार रात्री ८ वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ६९.८९ टक्के मतदान झालं आहे. बिहारमध्ये सर्वांत कमी सुमारे ५० टक्के मतदानाची नोंद झाली. झारखंडमध्ये ६९.०३ टक्के, हिमाचल प्रदेश ६७.४०, चंदीगड ६३, ओडिशा ६३.४२, पंजाब ५५.७० आणि उत्तर प्रदेशमध्ये ५५.९० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आयोगाच्या वतीने अंतिम आकडेवारी देण्यात आलेले नाही.

बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना

या काळात पश्चिम बंगालमध्ये अखेरच्या टप्प्यातही हिंसाचाराच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे आल्या आहेत. ईव्हीएममध्ये बिघाड, एजंट लोकांनी मतदान केंद्रांमध्ये प्रवेश करण्यापासून रोखणे, मतदानकेंद्रे तलावात फेकून देणे आणि मतदारांना धमकावल्याचे आरोप अशा अनेक घटना येथे घडल्या. बंगालमधील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी आणि भाजपचे अमित मालवीय यांनी संदेशखाली येथे आंदोलन करणाऱ्या महिलांचे व्हिडीओ शेअर केले आहेत.

आधीच्या टप्प्यांतील मतदानाटी टक्केवारी

follow us