Download App

Rahul Gandhi : लोकसभा अध्यक्षांकडून राहुल गांधींची संरक्षण समितीवर नियुक्ती

मोदी अडनावाप्रकरणी काँग्रेस नेते यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयाकडून त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. अखेर सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली आहे. खासदारकीनंतर आता राहुल गांधी यांंची संरक्षण समितीवरही नियुक्ती करण्यात आलीयं. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही नियुक्ती केली आहे.

कर्नाटक निवडणुकांदरम्यान 2019 मध्ये कोलार येथील प्रचार सभेत राहुल गांधींनी मोदी अडनावरून वादग्रस्त विधान केले होते. या प्रकरणी गुजरातचे भाजप नेते पूर्णेश मोदींनी गुजरातच्या सूरत न्यायालयात याचिका दाखल केली होती. वादग्रस्त विधानाबाबात माफी मागण्यास राहुल गांधींनी नकार दिल्याने त्यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.

Sharad Pawar : फडणवीसांचा फेमस डायलॉग उच्चारत पवारांनी सांगितलं PM मोदींचं भवितव्य

या शिक्षेमुळे राहुल गांधींची खासदारकीदेखील रद्द करण्यात आली होती. सुरत न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात अपील केले. मात्र, येथेही राहुल गांधींना दिलासा मिळाला नव्हता. त्यानंतर मार्चमध्ये गुजरात सरकारने हा निर्णय कायम ठेवत राहुल गांधींचे संसद सदस्यत्व रद्द केले. खासदारकी रद्द झाल्याने राहुल गांधींनी त्यांचा दिल्ली येथील सरकारी बंगलाही रिकामा केला होता.

सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर त्यांना खासदारकी बहाल करण्यात आली. त्यानंतर शासकीय निवासस्थानही देण्यात आलं. राहुल गांधी खासदार असताना त्यांना 12 तुघलक लेन या ठिकाणी ते रहिवास करत असतं. आता पुन्हा एकदा खासदाराकी बहाल झाल्यानंतर त्यांना 12 तुघलक लेन इथेच शासकीय निवासस्थान देण्यात आलं.

follow us