Loksabha Election : लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) बिगुल वाजल्यानंतर आता सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. येत्या 19 एप्रिलपासून देशात लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. अशातच आता भाजपकडून (BJP) स्टार प्रचारकांची घोषणा करण्यात आली असून या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांचे नाव आहे. तसेच महाराष्ट्रातील एकूण 20 नेत्यांच्या नावांची घोषणा करण्यात आलीयं.
साताऱ्याची जागा आमचीच, भाजप नेते ‘त्यांची’ समजूत काढतील : अजितदादांकडून उदयनराजेंच्या आनंदावर विरजण
महाराष्ट्रातले स्टार प्रचारक कोण?
१) एकनाथ शिंदे
२) अजित पवार
३) देवेंद्र फडणवीस
४) रावसाहेब दानवे
५) सम्राट चौधरी
६) अशोक चव्हाण
७) विनोद तावडे
८) पंकजा मुंडे
९) चंद्रशेखर बावनकुळे
१०) आशिष शेलार
११) सुधीर मुनगंटीवार
१२) राधाकृष्ण विखे पाटील
१३) पियूष गोयल
१४) गिरीश महाजन
१५) विजयकुमार गावित
१६) अतुल सावे
१७) धनंजय महाडीक
१८) अमर साबळे
१९) रविंद्र चव्हाण
२०) चंद्रकांत पाटील
आढळरावांचं ठरलं! आज अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश; ‘शिरुर’चा उमेदवारही ठरला
भाजपाने एकूण चाळीस नावांची घोषणा केली असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे इतर राज्यांमध्ये जाऊन प्रचार करणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर मध्य प्रदेश आणि बिहार राज्याच्या स्टार प्रचारकाची जबाबदारी देण्यात आलीयं. तर देवेंद्र फडणवीस यांनाही मध्य प्रदेशसाठी स्टार प्रचारक म्हणून नेमण्यात आलं आहे. विनोद तावडे यांच्यावर बिहारच्या स्टार प्रचारकाची जबाबदारी देण्यात आली आहे. स्मृती ईराणी आणि मनोज तिवारी यांचीही नावे स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत.