Download App

जनता जनार्दन मोदींच्या ‘गॅरंटी’वर खूश पण…; मोठ्या सर्व्हेक्षणात मतदारांनी मनातलं सांगितलं!

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Pudhari CSDS Lokniti Pre Voting Survey : लोकसभेच्या रणांगणात सगल तिसऱ्यांना जनता जनार्दन नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पंतप्रधान बनवण्यास इच्छूक असल्याचे दिसून आले आहे. ‘पुढारी आणि सीएसडीएस लोकनीती’ ने केलेल्या सर्व्हेक्षणातून हे चित्र स्पष्ट झाले आहे. 19 राज्यातील 100 लोकसभा मतदारसंघांतील 10,000 हून अधिक मतदारांच्या सर्वेक्षणातून देशात ‘फिर एक बार मोदी सरकार’ हा कल समोर आला आहे. या सर्व्हेक्षणात विरोधकांच्या इंडिया आघाडीचं नेमकं कुठं चुकलं याबाबतही मतदारांनी उघडपणे भाष्य केले आहे.

सकाळी बड्या नेत्याची भेट अन् दुपारी उमेदवारीची घोषणा; हातकणंगलेतून आवाडे कोणाचा गेम करणार?

सलग तीन सर्वेक्षणे अचूक

‘सीएसडीएस-लोकनीती’ने गेल्या तीन मतदानपूर्व सर्वेक्षणांत नोंदविलेला कल अचूक ठरला आहे. केंद्र सरकारला पुन्हा संधी मिळाली पाहिजे का, या प्रश्नावर 2009 मध्ये 55 टक्के (यूपीए विजयी), 2014 मध्ये 23 टक्के (यूपीए पराभूत), तर 2019 मध्ये 47 टक्के (एनडीए विजयी) मतदारांनी ‘होय’ असे म्हटले होते.

पुन्हा मोदींना संधी मतदार म्हणतात…

या सर्व्हेक्षणात मोदी मोदी सरकारला तिसऱ्यांदा संधी दिली पाहिजे का असा प्रश्न विचारण्यात आला असता 44 टक्के मतदारांनी ‘होय’ असे उत्तर दिले असून, बहुसंख्य मतदार मोदी सरकारला ‘आणखी एक संधी’ देण्यास इच्छुक असल्याचे सर्वेक्षणाचे संचालक आणि राज्यशास्त्राचे प्राध्यापक सुहास पळशीकर यांनी सांगितले. देशातील आठ टक्के मुस्लिम मोदी सरकारवर पूर्ण समाधानी, तर 24 टक्के मुस्लिम अंशतः समाधानी आहेत. 68 टक्के हिंदू उच्चवर्णीय मोदी सरकारच्या कामगिरीवर समाधानी असून, ६३ टक्के हिंदू ओबीसी मोदी सरकारवर खूश आहेत. तर, 57 टक्के हिंदू एससी आणि 58 टक्के हिंदू एसटी मोदी सरकारबाबत समाधानी असल्याचे दिसून आले.

फडणवीसांनी रस्त्यातच विचारलं भाजपात येता का? राणेंनी सांगितला पक्षप्रवेशाचा भन्नाट किस्सा!

सर्व आर्थिक स्तरांतील मतदार अनुकूल
आर्थिकदृष्ट्या श्रीमंत आणि संपन्न वर्गात मोदी सरकारबद्दलची अनुकूलता 62 टक्के इतकी असून, 57 टक्के मध्यमवर्गीय मोदी सरकारवर खूश आहेत. निम्न आर्थिक स्तरातील 56 टक्के, गरीब वर्गातील 55 टक्के मतदार मोदी सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहेत. गावपातळीवरील मोदी सरकारची क्रेझ कायम असून, गावांमध्ये राहणारे 60 टक्के मतदार मोदी सरकारच्या कामगिरीवर समाधानी असून, निमशहरी भागात ही टक्केवारी 51 टक्के; तर शहरी भागात 49 टक्के इतकी आहे.

इंडिया आघाडीचे मुद्दे प्रभावी पण…

2014 ला काँग्रेसची सत्ता उलथवून टाकत भाजपने सत्ता स्थापन केली. त्यानंतर 2019 मध्ये जनतेने काँग्रेसला सत्तेतून बाहेर बसवले होते.त्यानंतर आता 2024 च्या निवडणुकांमध्येही जनेतेचा कौल ‘फिर एक बार मोदी’ सरकार असल्याचाच देशभरात दिसून येत असून, सर्व्हेक्षणात मतदारांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीने मोदी सरकारला कात्रीत पकडण्यासाठीचे मुद्दे अतिशय योग्य निवडल्याचे मत मांडले पण, हे मुद्दे जनतेसमोर प्रभावीपणे मांडण्यात विरोधक सपशेल फेल झाल्याचे मतदारांनी स्पष्ट सांगितले. रोजगाराच्या मर्यादित संधी, वाढती महागाई, ग्रामीण भागातील संकटे यासह अनेक समस्या मतदारांसमोर उभ्या असल्याचे दिसून आले पण हे मुद्दे जरी विरोधक उपस्थित करत असले तरी, या सर्व समस्यांचं संधीत रूपांतर करण्यासाठी विरोधकांकडे कोणतीही ठोस अशी रणनीती नसल्याचे जनतेचं म्हणणं आहे.

पडद्यामागचं राजकारण! भाजपात फडणवीस विरूद्ध सगळे; नेमकं काय घडतंय

आम्हाला अच्छे दिन आले मतदारांनी केलं मान्य

या सर्व्हेक्षणात ज्या पद्धतीने महागाई, बेरोजगारी, विरोधकांची रणनीती याबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्याचप्रमाणे मोदी वेळोवेळी सांगत असलेल्या ‘अच्छे दिन’ खरचं आले का? असा प्रश्न मतदारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर गेल्या पाच वर्षांत आयुष्य ‘अधिक चांगले’ झाले असल्याचे मत समोर आले आहे. गेल्या पाच वर्षांत सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विकास पोहोचल्याचे मत 48 % लोकांनी व्यक्त केले आहे. तर, आमची परिस्थिती होती राहिल्याचे मत 14 टक्के मतदारांनी व्यक्त केले आहे. 15 टक्के लोकांनी विकासच झाला नसल्याचे म्हटले आहे. निम्न आर्थिक स्तरातील 48 टक्के; तर गरीबवर्गातील 41 टक्के नागरिकांच्या मते सर्वांचा विकास झाल्याचे मत आहे.

कलम 370 ला मतदारांचा पाठिंबा

सर्व्हेक्षणादरम्यान जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याच्या मोदी सरकारचा निर्णय एकदम योग्य असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे एकीकडे विरोधकांनी या निर्णयाविरोधात रान पेटवलं तरी मतदारांनी कलम 370 साठी मोदी सरकारला भक्कम पाठिंबा दिल्याचे दिसून आले आहे. मोदींचा हा निर्णय योग्य असल्याचे मत 34 टक्के मतदारांनी व्यक्त केल. पण जरी हा निर्णय चांगला असला तरी, त्याची अंमलबजावणीची पद्धत योग्य नसल्याची भावना 16 टक्के मतदारांची आहे. हा निर्णय चुकिचा असल्याचे मत 8 टक्के मतदारांनी व्यक्त केले आहे.

सुपर बाईक्स, अलिशान कार अन्…; भाजपच्या श्रीमंत मंत्र्यानं प्रतिज्ञापत्रकात दाखवलं माफक उत्पन्न

बेरोजगारी अन् महागाईवरून मतदार नाराज

एकीकडे मतदार तिसऱ्यांना मोदींना सत्तेत आणण्यास जरी इच्छूक असले तरी, दुसरीकडे मात्र, बेरोजगारीवरून 27 टक्के, तर महागाईवरून 23 टक्के मतदार भाजपप्रणीत एनडीए सरकारवर नाराज असल्याचे दिसून आले आहे. केवळ 13 टक्केच मतदार मोदी सरकारच्या विकासकामांवर खूश असल्याचेही या सर्व्हेक्षणात समोर आले आहे.

follow us

वेब स्टोरीज