Narendra Modi : लेबल कुछ है और माल कुछ है ! विरोधकांची बैठक म्हणजे ‘कट्टर भ्रष्टाचारी संमेलन’

Narendra Modi : लेबल कुछ है और माल कुछ है ! विरोधकांची बैठक म्हणजे ‘कट्टर भ्रष्टाचारी संमेलन’

Narendra Modi on Opposition Patries Meeting : आगामी लोकसभा निवडणुकीत काहीही करून केंद्रातील सत्ताधारी भाजपाचा पाडाव करायचा या उद्देशाने देशातील विरोधी पक्षांचे नेते आज बंगळुरूत जमा झाले आहेत. येथे प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक (Opposition Parties Meeting) होत आहे. या बैठकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

मोदींनी या संमेलनाला भ्रष्टाचाऱ्यांचे संमेलन म्हणत जोरदार टीका केली. मोदी आज पोर्ट ब्लेअरमध्ये आहेत. येथे त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एका टर्मिनलचे उद्घाटन केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

ते पुढे म्हणाले, हे लोक प्रचंड भ्रष्टाचार करत असून आता बंगळुरूत जमा झाले आहेत. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या काळात भारत खूप प्रगती करू शकला असता. भारतीयांच्या सामर्थ्यात कधी कोणतीही कमतरता नव्हती मात्र देशातील भ्रष्टाचारी आणि घराणेशाही चालविणाऱ्या पक्षांनी सामान्य भारतीयांच्या या सामर्थ्यावर अन्यायच केला असे हल्लाबोल करत मोदी यांनी अवधी भाषेतील कवितेच्या ओळी म्हणून दाखवल्या. गाइत कुछ है, हाल कुछ है, लेबिल कुछ है, माल कुछ है. 24 वरुन 26 वर पोहोचलेल्या विरोधी पक्षांवर या ओळी एकदम फीट बसतात.

विरोधी पक्षातील लोक त्यांच्या दुकाना उघडून आम्हाला रोखण्याचे प्रयत्न करत आहेत. या मंडळींच्या दुकानांवर फक्त दोनच गोष्टींची गॅरंटी आहे. एकतर हे लोक त्यांच्या दुकानांतून जातीवादाचे विष विकत आहेत आणि दुसरे म्हणजे प्रचंड भ्रष्टाचारही करत आहेत.

Maharashtra Assembly Session : पहिल्या दिवशी दांडी, दुसऱ्या दिवशी आले पण फक्त तीनच; आंदोलनातही राष्ट्रवादीचा ‘रिव्हर्स गिअर’

आता तर हे सगळेच भ्रष्टाचारी मोठ्या प्रेमाने एकमेकांना भेटत आहेत. पण यांच्या दुकानात जमा झालेले लोक घराणेशाहीचे समर्थक आहेत. या लोकांचा एकच अजेंडा आहे तो म्हणाजे आपला परिवार वाचवा, परिवारासाठी भ्रष्टाचार वाढवा, अशी घणाघाती टीका मोदींनी केली.

काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये प्रचंड हिंसाचार उसळला होता. मात्र या घटनेवर सगळ्यांचीच बोलती बंद झाली होती. काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे कार्यकर्ते स्वतःच्या संरक्षणासाठी मदतीची याचना करत आहेत. मात्र, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना तेथे मरायला सोडून दिले आहे.

दारू घोटाळेवाल्यांवर कारवाई झाली तर ही मंडळी त्या पक्षाला वाचविण्याचे काम करू लागली. तपास यंत्रणा त्यांचे काम करतात तर हे लोक त्याला षडयंत्र म्हणून टीका करतात. तामिळनाडूत तुम्ही पाहिलेच असेल की कशा पद्धतीने घोटाळे बाहेर येत आहेत. त्यामुळे या लोकांना कितीही षडयंत्र रचू द्या आम्ही मात्र देशासाठी काम करतच राहणार असल्याचे मोदी यांनी ठणकावून सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज