Sambit Patra On Rahul Gandhi : निवडणूक आयोगाचे मुख्य नियुक्त आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधक कमालीचे आक्रमक झाले आहे. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज विरोधकांनी संसद भवानापासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत मोर्चा काढत राजीनाम्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे आता भाजपचे खासदार आणि प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेससह राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप ज्ञानेश कुमार यांच्या मदतीने नाहीतर भगवान गणेश जीच्या कृपेने निवडणुका जिंकत आहे असं देखील यावेळी संबित पात्रा म्हणाले.
भारतातील जनतेकडे बुद्धी, शहाणपण आणि ज्ञान आहे.
घराणेशाही, भ्रष्टाचार आणि दहशतवाद यांच्या विरोधात आवाज उठवण्यात अपयशी ठरणाऱ्यांना मतदान करू नये, याची भारतीयांना जाणीव आहे असं देखील संबित पात्रा म्हणाले. तर यावेळी त्यांनी कॅप्टन स्मित (Captain Smith) यांचा उल्लेख देखील केला. ज्यांनी कॅप्टन स्मित यांच्या समर्थनार्थ एक ट्विटही केले नाही, त्यांना मतदान करू नये हे जनतेला माहित आहे. त्याऐवजी, “मी देशाला झुकू देणार नाही,” अशी घोषणा करणाऱ्या व्यक्तीलाच मते दिली पाहिजेत.
“काँग्रेसला देशात अराजकतेचे वातावरण निर्माण करायचे आहे”
संबित पात्रा (Sambit Patra) यांनी सांगितले की, काँग्रेससह (Congress) विरोधी पक्ष सत्तांतर घडवून आणण्यासाठी आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सहजपणे सत्तेवर बसवण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न करत आहेत. हे साध्य करण्यासाठी ते भारताची लोकशाही आणि घटनात्मक संस्थांवर जाणीवपूर्वक हल्ले करत आहेत. हे काही महिन्यांपासून नाही तर अनेक वर्षांपासून सुरू आहे. राहुल गांधी यांना यशस्वीपणे प्रस्थापित करण्याचे प्रयत्न वारंवार अयशस्वी ठरल्यानंतर, काँग्रेस आणि त्यांच्या काही मित्रपक्षांनी ठरवले की त्यांना प्रस्थापित करण्यासाठी ते कोणत्याही थराला जातील मग त्यासाठी भारताच्या लोकशाहीवर हल्ला करावा लागला किंवा अराजकता पसरवावी लागली तरीही असं म्हणत त्यांनी राहुल गांधींना दहा प्रश्न विचारले.
1) मतदार यादीतून 2.8 कोटी मृत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. ही नावे वगळली जाऊ नयेत का?
2) राहुल गांधी आणि सोनिया गांधी मते चोरून खासदार झाले का? जर आम्ही मते चोरून खासदार झालो असू, तर तेही मते चोरूनच खासदार झाले का?
3) कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेशातील सरकारे मते चोरून स्थापन झाली होती का?
4) स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षाची सरकारे स्थापन झाली, ती सरकारे बेकायदेशीर होती का?
5) 6.8 लाख मतदान केंद्रांवरील विरोधी पक्षांचे ‘बूथ लेव्हल एजंट्स’ (BLAs) नावे वगळल्याबद्दल आणि ती पुन्हा समाविष्ट करण्याच्या गरजेबद्दल तक्रार का करत नाहीत? त्यांचे एजंट्स काय करत होते? केवळ त्यांच्या एजंट्सनी त्यांचे काम केले नाही म्हणून आमच्या एजंट्सनीही ते करू नये का?
6) 1993 पर्यंत, भारतीय निवडणूक आयोगाची निवड केवळ एकाच व्यक्तीद्वारे म्हणजेच तत्कालीन पंतप्रधानांद्वारे केली जात असे. याचा अर्थ असा की, तुम्ही निवडणूक आयोगात तुमच्या मर्जीतील ‘कठपुतळी’ (puppet) नेमत होतात का? राहुल गांधींनी याचेही उत्तर दिले पाहिजे.
7) विरोधी पक्ष जिंकला की निवडणूक आयोग योग्य वाटतो, पण हरला की निवडणूक आयोग आणि लोकशाहीविरुद्ध ओरड केली जाते… असे का?
8) निवडणुकांना विरोध करून, काँग्रेस पक्ष लोकशाही आणि संविधानाबाबत अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत नाही का?
#WATCH | Delhi: Ahead of INDIA bloc MPs’ protest march to ECI, BJP National Spokesperson and MP Sambit Patra says, “It is not Gyanesh ji, but Ganesh ji, who is helping us. BJP is being helped by Ganesh ji – the God of wisdom, knowledge and sense; not Gyanesh ji. People of India have wisdom, knowledge and sense. They know to not vote for dynasty, corruption and people who stand with terrorists, those who cannot even tweet for Captain Smit. They know that they have to vote for the one who says, “main desh nahi jhukne doonga.”
— ANI (@ANI) October 6, 2026
9) अराजकता पसरवून राहुल गांधींना पुन्हा प्रस्थापित करण्याचा (relaunch) प्रयत्न केला जात नाही का?
तयार राहा, Jio चा IPO ‘या’ दिवशी येणार ; इतिहासातील सर्वात मोठा IPO ठरू शकतो-
10 ) राजीव गांधींनीच ईव्हीएम (EVMs) आणले होते. मग आज राजीव गांधींविरुद्ध निषेधाच्या घोषणा दिल्या जातील की नाही?
