इराण-अमेरिका युद्धाचा फटका, एलपीजी सिलिंडर महागलं; जाणून घ्या नवीन किंमत

LPG Cylinders Price : अमेरिका, इस्त्रायल आणि इराण दरम्यान सुरु असणाऱ्या युद्धाचा फटका आता भारताला देखील बसण्यास सुरुवात झाली आहे.

LPG Cylinders Price

LPG Cylinders Price

LPG Cylinders Price : अमेरिका, इस्त्रायल आणि इराण दरम्यान सुरु असणाऱ्या युद्धाचा फटका आता भारताला देखील बसण्यास सुरुवात झाली आहे. या युद्धामुळे देशात घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे. 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 60 रुपयांची तर 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत तब्बल 115 रुपयांची वाढ झाल्याने सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, वाढलेल्या किमती (LPG Cylinders Price) आजपासून (7 मार्च) पासून लागू होणार आहे. अचानक घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्याने दिल्लीत आता 14.2 किलोच्या गॅससाठी 913 रुपये मोजावे लागणार आहे. याआधी दिल्लीमध्ये 14.2 किलोचा घरगुती गॅससाठी 863 रुपये मोजावे लागत होते. तर व्यावसायिक सिलेंडरची किंमत आता 1883 रुपये आणि मुंबईत 1835 रुपये होणार आहे.

अमेरिका (America) आणि इस्त्रायलने (Israel) इराणवर (Iran) केलेल्या हल्ल्यानंतर भारतात गॅसच्या किमती वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. तर दुसरीकडे युद्धामुळे किमतीवर परिणाम झाला की नाही याबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. सरकारी आकडेवारीनुसार,   गेल्या आर्थिक वर्षात भारताचा एलपीजीचा वापर अंदाजे 31.3 दशलक्ष टन होता, ज्यापैकी फक्त 12.8 दशलक्ष टन उत्पादन भारतात झाले होते.

‘या’ 6 राशींच्या जीवनात होणार बदल; जाणून घ्या सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस कसा राहणार?

भारत एलपीजीसाठी आखाती देशांवर अवलंबूनभारत प्रामुख्याने एलपीजीसाठी सौदी अरेबिया आणि इतर देशांवर अवलंबून आहे मात्र युद्धामुळे इराणने मोठा निर्णय घेत होर्मुज स्ट्रेट बंद केल्याने भारतात गॅस पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे आता भारतात एलपीजी उत्पादन वाढवण्यासाठी, पेट्रोलियम मंत्रालयाने 5 मार्च रोजी तेल शुद्धीकरणादरम्यान उत्पादित होणारा प्रोपेन आणि ब्युटेन वायू फक्त एलपीजी उत्पादनासाठी वापरण्याचे निर्देश जारी केले. एलपीजी हे प्रोपेन आणि ब्युटेन वायूंचे मिश्रण आहे आणि ते प्रामुख्याने देशात घरगुती स्वयंपाकाच्या गॅस म्हणून वापरले जाते.

Exit mobile version