Download App

मोठी बातमी : मोदी सरकारचा सामान्यांना झटका; घरगुती सिलिंडर ५० रुपयांनी महागला

  • Written By: Last Updated:

LPG cylinder prices hiked by Rs 50 for both subsidised, non-subsidised consumers : पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पाद शुल्कात दोन रूपयांची वाढ केल्यानंतर, आता मोदी सरकारने घरगुती सिलिंडरच्या (LPG Cylinder Prices) किमतीत तब्बल 50 रूपयांची वाढ करत मोठा झटका दिला आहे. याबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी माहिती दिली. वाढीव दर आज रात्री १२ वाजल्यापासून लागू होतील.

सरकारने एक वर्षानंतर घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केला नव्हता. गॅस सिलिंडरच्या किमतीत शेवटचा बदल ९ मार्च २०२४ रोजी करण्यात आला होता. त्यानंतर सरकारने गॅस सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांची कपात केली होती. विशेष म्हणजे जुलै २०२२ नंतर घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. तरीही गॅस सिलेंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दुसरीकडे, सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबतही एक भाकित केले आहे. सरकारने म्हटले आहे की,पेट्रोल आणि डिझेलच्या किमती लवकरच कमी होऊ शकतात.

शेअर बाजारानंतर केंद्राचा सरकारने जनतेला दिला धक्का! पेट्रोल अन् डिझेल महागणार?; GR निघाला

वाढीनंतर किती रूपयांना मिळणार गॅस सिलिंडर 

घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ केली जात असून, ही दरवाढ आज (दि.7) मध्यरात्री 12 वाजेपासून लागू होईल. त्यानंतर देशाची राजधानी दिल्लीत गॅस सिलिंडरची किंमत ८०३ रुपयांवरून ८५३ रुपये होईल. तसेच, कोलकातामध्ये किंमत ८२९ रुपयांवरून ८७९ रुपये, मुंबईत ८०२.५० रुपयांवरून ८५३.५० रुपये आणि चेन्नईमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ८१८.५० रुपयांवरून ८६८.५० रुपये होईल. दुसरीकडे, उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. उज्ज्वला योजनेचा गॅस सिलिंडर ग्राहकांना ५०० रुपयांऐवजी आता ५५० रुपये मोजावे लागणार आहेत.

ब्लॅक मंडे! 10 सेकंदात 19 लाख कोटी रुपये बुडाले, सेन्सेक्स आणि निफ्टीत 5 टक्क्यांनी घसरण

दरवाढीनंतर काँग्रेसने सरकारला घेरलं

एलपीजी सिलिंडरच्या किमतीत  50 रूपायांची वाढ जाहीर केल्यानंतर काँग्रेसने एक्सवर पोस्ट करत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पोस्टमध्ये काँग्रेसने ‘महंगाई मैन’ मोदींनी जनतेला महगाईचा तगडा झटका दिल्याचे म्हटले आहे. मोदी सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करत आधीच महागाईने त्रस्त जनतेच्या जखमांवर मोदी सरकारने मीठ चोळण्याचे काम केले असून, मोदी सरकारची वसुली चालू असल्याचे म्हटले आहे.

 

follow us