तंजावर : माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या हत्येच्या कटात सहभागी असलेला श्रीलंकेतील एलटीटीई (LTTE) नेता व्ही. प्रभाकरन (V. Prabhakaran) जिवंत असल्याचा दावा करण्यात आलाय. हा दावा तमिळ संघटनांच्या जागतिक महापरिषदेचे अध्यक्ष पी नेदूमारन यांनी केलाय.
लिट्टे या तमिळ वाघांच्या संघटनेचा प्रमुख असलेला व्ही प्रभारकन याचा यापूर्वीच मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या श्रीपेरांबुद्दूर येथे झालेल्या भीषण हत्येत त्याचा सहभाग होता. ही हत्या होण्यापूर्वीही एकदा प्रभाकरनचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र या हत्येनंतर अचानक लिट्टेकडून प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा करण्यात आला होता.
श्रीलंकन लष्कराने तमिळ बंडखोरांचा नायनाट करण्यासाठी जाफना आणि उत्तर श्रीलंकेत केलेल्या लढाईत लिट्टे सह त्याचा प्रमुख व्ही प्रभाकरन ही मारला गेल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (एलटीटीई) या संघटनेचा प्रमुख व्ही. प्रभाकरन अजूनही जिवंत आहे आणि तो आपल्या कुटुंबासह राहत आहे, असा दावा आता माजी काँग्रेस नेते पळा नेदुमारन यांनी केला आहे. नेदुमारन यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना हा दावा केल्यानं खळबळ उडाली आहे.
Raj Thackeray यांच्या ताफ्यात नवी Land Cruiser…लकी नंबर मात्र जुनाच
प्रभाकरनच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असल्याचे नेदुमारन यांनी सांगितलं. “मी प्रभाकरनच्या इच्छेनुसार तो जिवंत असल्याचं उघड करत आहे,” असंही ते म्हणाले आहेत. तामिळनाडूमधील तंजावरजवळील विलार येथील मुल्लिवाइक्कल मेमोरिअलमध्ये सोमवारी तमिळांच्या जागतिक महासंघाचे प्रमुख पी नेदुमारन यांनी सांगितलं की, ”प्रभाकरन लवकरच तमिळ नागरिकांसाठी आनंदाची बातमी देतील. जगातील सर्व तामिळ नागरिकांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे” एलटीटीई प्रमुख लवकरच लोकांसमोर येणार असल्याचा दावा नेदुमारन यांनी केला.