Roop Bansal : ED ने M3M चे प्रमोटर रूप बन्सल (Roop Bansal) यांना अटक केली आहे. गुंतवणूकदार आणि फ्लॅट खरेदीदारांची फसवणूक आणि मनी लाँड्रिंगच्या (Money laundering) आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे. अलीकडेच ED ने IREO आणि M3M प्रकरणात दिल्ली आणि गुरुग्राममध्ये 7 ठिकाणी छापे टाकले होते. गुंतवणूकदार आणि फ्लॅट खरेदीदारांच्या गुंतवलेल्या पैशांची फसवणूक केल्याप्रकरणी हा छापा टाकण्यात आला. या छाप्यात एजन्सीने लॅम्बोर्गिनी, लँड रोव्हर, रोल्स रॉयस, बेंटले, मर्सिडीज मेबॅकसह 17 महागडी वाहने जप्त केली. याशिवाय 5.75 कोटी रुपयांचे दागिने आणि 15 लाख रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. (M3M group promoter Roop Bansal arrested by ED in case of Rs 400 crore hawala)
काही दिवसांपूर्वी गुरुग्राममध्ये ईडीने आयआरईओ आणि एम3एम ग्रुपच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. तपासात एजन्सीला कळले की एम3एम ग्रुपने गुरुग्राममधील 4 कोटी किमतीच्या जमिनीचे हक्क पाच शेल कंपन्यांना 10 कोटींना विकले. मात्र या पाच कंपन्यांनी 4 कोटी किमतीच्या जमिनीचे हक्क आयआरईओ ग्रुपला 400 कोटींना विकले, म्हणजेच 400 पट अधिक किमतीत हा करार करण्यात आला.
Champions Trophy 2025: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का, चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद जाणार
बनावट कंपन्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले जायचे
IREO ग्रुपकडून 400 कोटी मिळाल्यानंतर या पाच कंपन्यांनी इतर बनावट कंपन्यांच्या माध्यमातून हे पैसे M3M ग्रुपला ट्रान्सफर केले. म्हणजे, या कंपन्यांचा M3M शी कुठलाही संबंध नाही हे दाखवण्यासाठी, M3M ने सुद्धा या पाच कंपन्यांशी आपला संबंध नसल्याचा दावा केला होता, पण या पाच बनावट कंपन्या M3M च्या संचालकांच्या मालकीच्या असल्याचं तपासात समोर आलं आहे. या कंपन्या फक्त बसंत बन्सल आणि रूप कुमार बन्सल हेच पाहतात.
याआधी IREO ग्रुपच्या संचालकांना अटक
या प्रकरणी ED ने नोव्हेंबर 2021 मध्ये IREO ग्रुपचे संचालक ललित गोयल यांनाही अटक केली होती, जे सध्या तुरुंगात आहे. या प्रकरणाबाबत भाजप नेते सुधांशु मित्तल यांनी ललित गोयल यांच्या पत्नीसह ईडी प्रकरणांचे न्यायाधीश सुधीर परमार यांची भेट घेतली आणि दिलासा देण्याबाबत चर्चा केली. सुधांशू मित्तल हे ललित गोयल यांचे नातेवाईक आहेत. जेव्हा ईडीला कळले की आरोपी न्यायाधीशांना आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यानंतर त्यांनी तपास केला. 17 एप्रिल 2023 रोजी हरियाणा लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने न्यायाधीश सुधीर परमार आणि एम3एमच्या संचालकांना अटक केली.