माफिया अतिक अहमदने हत्येपूर्वी सुप्रीम कोर्टाला पत्र लिहिले होते, मारेकऱ्याचा केला होता उल्लेख

Atiq Ahmed Letter To Supreme Court: माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांच्या हत्येनंतर दोन्ही भावांनी लिहिलेल्या पत्रांची चर्चा सुरु आहे. अश्रफ आणि अहमद यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले होते. आता अशीही माहिती समोर आली आहे की, अतिक अहमदने हत्या होण्याच्या सुमारे दोन आठवडे आधी सर्वोच्च न्यायालयाला पत्रही लिहिले होते. […]

Untitled Design (13)

Untitled Design (13)

Atiq Ahmed Letter To Supreme Court: माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांच्या हत्येनंतर दोन्ही भावांनी लिहिलेल्या पत्रांची चर्चा सुरु आहे. अश्रफ आणि अहमद यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले होते. आता अशीही माहिती समोर आली आहे की, अतिक अहमदने हत्या होण्याच्या सुमारे दोन आठवडे आधी सर्वोच्च न्यायालयाला पत्रही लिहिले होते. अतिक अहमद यांचे पत्र असलेला सीलबंद लिफाफा समोर आला आहे.

अतिक अहमदचे वकील विजय मिश्रा यांनी सांगितले की, जेव्हा ते बरेली तुरुंगात अश्रफला भेटले तेव्हा अश्रफने तुरुंगातून बाहेर काढताच त्याला मारले जाईल असे सांगितले होते. अशरफने दावा केला की, त्याला ठार मारणाऱ्या व्यक्तीचे नाव माहित आहे.

विजय मिश्रा म्हणाले की, त्यांनी अश्रफ यांना त्या व्यक्तीबद्दल विचारले होते, मात्र अश्रफ यांनी त्यांचे नाव उघड केले नाही. पत्रात नाव लिहिले आहे, पत्र एका सीलबंद लिफाफ्यात आहे आणि ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाठवले जाईल, असे त्यांने सांगितले होते. विजय मिश्रा म्हणाले की पत्र गेले आहे, पोहोचले असेल किंवा पोहोचेल. अतिक आणि अश्रफ यांच्या कुटुंबीयांच्या जवळच्या लोकांकडे हे पत्र ठेवण्यात आले होते आणि तेथून ते पाठवण्यात आल्याचे सांगितले.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; पुण्यात पोलिसांचा लाठीचार्ज

शनिवारी (15 एप्रिल) रात्री 10.30 वाजता उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील कोल्विन हॉस्पिटलजवळ अतिक आणि अशरफ यांची तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. पोलीस कोठडीत दोन्ही भावांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण विभागात खळबळ उडाली होती. अतिक आणि अशरफ यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले जात असताना, ते प्रसारमाध्यमांशी बोलण्यासाठी थांबले असताना ही घटना घडली.

या प्रकरणाच्या तपासासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी तीन सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. उत्तर प्रदेशचे विशेष पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सोमवारी सांगितले की, प्रयागराज पोलीस आयुक्त रमित शर्मा यांच्या सूचनेनुसार एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.

Exit mobile version