गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; पुण्यात पोलिसांचा लाठीचार्ज

  • Written By: Published:
Gautami Patil Vhayral Video

Gautami Patil: प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रमाला तरुणांची तुफान गर्दी असते. त्यातून अनेकदा वाद होतो. पोलिसही कारवाई करतात. आता पुण्यातील वेल्हे तालुक्यातील एका गावात गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात जोरदार राडा झाला आहे. तरुणांनी जोरदार गोंधळ घातल्यानंतर त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडणार? शरद पवारांशी बोलून पक्षांतर करणार

पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील विंझर गावात गौतमी पाटीलचा डान्सचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मनसे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम होता. कार्यक्रमासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. तसेच बॉडिगार्डही ठेवण्यात आले होते.

महाराष्ट्रात लवकरच ऑपरेशन कमळ, पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा

कार्यक्रमाला तरुणाईची तुफान गर्दी झाली होती. अनेक गावातून तरुण गौतमी पाटीलचा जलवा बघण्यासाठी आले होते. गौतमी पाटील स्टेजवर आली. पाटलांचा बैलगाडा या गाण्यावर गौतमी डान्स करत होती. तरुणांनी बेभान झाली. तेही नाचू लागले. त्यात काही जण खुर्च्या डोक्यावर घेऊन नायाचला सुरुवात केली.

शेवटी धिंगाणा वाढला. तरुण एकमेंकाना मारहाण करून लागली. गर्दी आवरताना पोलिसांची दमछाक झाली. शेवटी पोलिसांनी लाठीचार्ज करून परिस्थिती आटोक्यात आणली आहे. गर्दी आवरत नसल्याने अखेर आयोजकांना कार्यक्रम बंद केला आहे.

Tags

follow us