Online fraud : धक्कादाय माहिती समोर आली आहे. सध्या नोकऱ्या मिळत नाहीत. बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सर्वांना वाटत आपल्याला नोकरी मिळेल. त्या अपेक्षेने युवक ऑनलाईन जाळ्यात फसतात. ऑनलाईन नोकरीचं आमीष दाखवून सहा कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या नेटवर्कचा पर्दाफाश करत उत्तर विभाग सीईएन पोलिसांनी दहा जणांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र, (fraud) कर्नाटकसह २१ राज्यांत १२२ एनसीआरपी गुन्हे दाखल असल्याचं उघड झालं आहे. त्यांच्याकडून ७२ मोबाईल फोन, १८२ डेबिट कार्ड, २ लॅपटॉप, १३३ सिमकार्ड, १२७ बँक पासबुक आणि १.७४ लाखांची रोकड जप्त करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याचं शहर पोलीस आयुक्त बी. दयानंद यांनी सांगितलं.
ऑनलाईन टास्क दिला
याप्रकरणी सय्यद याय्हा, उमर फारुक, मोहम्मद माहीन, मोहम्मद मुझामिल, तेजेश, चेतन, वसीम, सय्यद जायद, साही अब्दुल अनान आणि ओमप्रकाश अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. सात जून रोजी आरोपीने बागलगुंटे येथील टी. दासरहळ्ळी येथील एका व्यक्तीच्या मोबाईलवर व्हॉटस् ॲप मेसेज पाठवून ऑनलाईन नोकरी देतो, असे सांगितलं. यानंतर त्याला ऑनलाईन टास्क देऊन आमिष दाखवत त्याच्या खात्यावर अधिक पैसे जमा करून विश्वास निर्माण केला.
बीडच्या आष्टी तालुक्यात जात पंचायतीची अघोरी प्रथा; प्रेमविवाह केल्याने ठोठावला अडीच लाखांचा दंड
याशिवाय क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळेल, असा विश्वास दाखवून ६ जून ते १ जुलै या कालावधीत २५ लाख ३७ हजार ८१५ रुपयांची रक्कम हस्तांतरित करून फसवणूक केल्याचा गुन्हा उत्तर विभाग सीईएन सायबर क्राईम पोलीस ठाण्यात दाखल झाला. सायबर क्राईम पोलिसांनी ज्या खात्यांद्वारे विविध बँक खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित केलं, त्या खातेदारांची माहिती मिळवली आणि या नेटवर्कमध्ये सामील असलेल्या १० पैकी सात जणांना अटक केली. पसार असलेल्या अन्य तिघांच्या माहितीच्या आधारे त्यांना अटक केली. तिघे चीनला गेले होते. त्यांना तेथून परतत असताना पकडलं.
अटक केली
अटक करण्यात आलेल्या १० आरोपींपैकी दोघांचे ४७ बँक पासबुक, ४७ सिमकार्ड, ३१ डेबिट कार्ड, गुन्ह्यात वापरलेले ९ मोबाईल फोन जप्त केले. सॅम्पीगेहळ्ळी पीजीमध्ये राहणाऱ्या तीन आरोपींकडे ५२ डेबिट कार्ड, ३४ मोबाईल फोन, ४० सिमकार्ड, १ लॅपटॉप आणि पीजीमध्ये ठेवलेली ३० बँक पासबुक जप्त केली. या प्रकरणातील सर्व आरोपी हे बंगळूर येथील असून, या प्रकरणाप्रमाणेच त्यांच्यावर विविध २१ राज्यांमध्ये एकूण १२२ एनसीआरपी गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी उत्तर विभागाचे डीसीपी सैदुलू अदावत, एसीपी पवन, निरीक्षक शिवरत्न यांच्या नेतृत्वाखालील कर्मचाऱ्यांनी अटक केली.