Online Fraud टाळण्यासाठी दूरसंचार विभागाचा मोठा निर्णय; कॉल फॉरवर्डिंग सेवा होणार बंद

Online Fraud टाळण्यासाठी दूरसंचार विभागाचा मोठा निर्णय; कॉल फॉरवर्डिंग सेवा होणार बंद

Online Fraud Call forwarding discontinued by Department of Telecom : देशामध्ये होत असलेली ऑनलाईन फसवणूक ( Online Fraud ) टाळण्यासाठी केंद्रीय दूरसंचार विभागाने ( Department of Telecom ) मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता मोबाईलमधील कॉल फॉरवर्डिंग ( Call forwarding ) ही सेवा बंद करण्यात येणार आहे. सोमवारी 15 एप्रिलपासून ही युएसएसडी आधारित कॉल फॉरवर्डिंग सेवा बंद होणार आहे.

‘बीआरएस’ला नगरी झटका! घनश्याम शेलारांना पक्षात घेत काँग्रेसची बेरीज; अजितदादांनाही धक्का?

यासाठी दूरसंचार विभागाने सर्व दूरसंचार कंपन्यांना हे आदेश दिले असून ते बंधनकारक आहेत. सध्या मोबाईलमध्ये युएसएसडी या फीचरद्वारे कॉल फॉरवर्डिंग सेवा सुरू करता येते. ही सेवा सुरू केल्यानंतर तुमच्या नंबरवर येणारे कॉल फॉरवर्ड केले जातात. मात्र ऑनलाइन फसवणूक करणारे आरोपी या सेवेचा वापर करून ग्राहकांची दिशाभूल करतात. त्यातून त्यांची फसवणूक करतात. त्यामुळे दूरसंचार विभागाने कॉल फॉरवर्डिंग ही सेवा सोमवारपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच यावेळी + 92 या क्रमांकापासून सावध राहण्याच्या सूचना देखील दूरसंचार विभागाने ग्राहकांना दिले आहेत.

युएसएसडी कोड म्हणजे काय?

युएसएसडी कोड म्हणजे एक असा शॉर्टकोड आहे. जो डायल करून आपण एखाद्या मोबाईल नंबर साठी काही सेवा सुरू करू शकतो किंवा बंद देखील करू शकतो. यातच कॉल फॉरवर्डिंग या सेवेचा देखील समावेश आहे. अनेकदा ग्राहकांकडून दोन मोबाईल नंबर वापरले जातत. त्यामुळे नेटवर्कच्या समस्येमुळे किंवा इतर काही कारणांमुळे एका नंबरवर फोन येऊन न शकल्यास ते फोन दुसऱ्या नंबरवर वळवण्यात यावे. त्यासाठी कॉल फॉरवर्डिंग ही सेवा वापरली जाते. मात्र याच सेवेचा ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांकडून गैरफायदा घेतला जातो.

भावाकडूनच Hardik Pandya ची कोट्यावधींची फसवणूक; मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तसेच अनेकदा ग्राहकांना फसवणूक करणाऱ्यांकडून *401# अशा प्रकारच्या युएसएसडी कोडवर कॉल करण्यास सांगितले जाते. मात्र अशा प्रकारचे कॉल्स केल्याने संबंधित ग्राहकाच्या मोबाईलवर येणारे फोन कॉल्स आणि एसएमएस त्या व्यक्तीच्या नंबरवर फॉरवर्ड होतात. जेणेकरून ग्राहकांच्या बँक अकाउंट, ऑनलाइन ट्रान्झॅक्शन्स, सोशल मीडिया अकाउंट, ओटीपी नंबर हे सर्व फसवणूक करणाऱ्याला मिळतं. त्यातून ग्राहकांची अर्थिक फसवणूक तसेच सामाजिक प्रतिमा मलिन करण्याची देखील प्रयत्न केला जातो. त्यामुळे केंद्रीय दूरसंचार विभागाने कॉल फॉरवर्डिंग ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या