फसवणूक झालेला मी नाहीच! ऑनलाईन फसवणुकीनंतर वैतागलेल्या सागर कारंडेची टाळाटाळ

फसवणूक झालेला मी नाहीच! ऑनलाईन फसवणुकीनंतर वैतागलेल्या सागर कारंडेची टाळाटाळ

Marathi Actor Comedian Sagar Karande Denied of 61 Lakh Online Fraud : सोशल मीडियावर पैसे कमवण्याच्या आमिषाला अनेक लोक बळी पडतात आणि मोठी फसवणूक होते. याचीच एक प्रचिती प्रसिद्ध मराठी कॉमेडियन, लेखक आणि अभिनेता सागर कारंडे (Karande ) यांना आली आहे. इंस्टाग्राम पोस्ट लाईक केल्यावर पैसे मिळतील, या आमिषाने त्यांची तब्बल ६१.८३ लाख रुपयांची फसवणूक झाली असल्याचं समोर आलं होतं मात्र यावर प्रश्न विचारला असता सागर कारंडेने असं काही घडलं असल्याचं फेटाळलं आहे.

काय म्हणाले सागर कारंडे?

या फसवनुकीच्या प्रकरणानंतर सागर कारंडे हे पिंपळगाव बसवंत येथे कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी माध्यमांनी त्यांना या प्रकरणावर प्रश्न विचारले सुरूवातीलया यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. मात्र त्यांनतर त्यांनी सांगितले की, माझी अशा प्रकारची कोणतीही फसवणूक झालेली नाही. तो फसवणूक झालेला सागर कारंडे दुसरा कोणी आहे. गुगलवर सर्च केल्यास या नावाचे अनेक लोक मिळतील त्यामुळे मी तो नाहीच असं म्हणंत सागर कारंडे यांनी यावर काहीही बोलणे टाळले आहे.

काय आहे प्रकरण?

सागर कारंडे यांनी सायबर पोलीस ठाण्यात (उत्तर विभाग) यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. ही फसवणूक कशा प्रकारे झाली, गुन्हेगारांनी कोणते डावपेच वापरले आणि अशा प्रकारांपासून लोकांनी कसं सावध राहावं, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. फेब्रुवारी महिन्यात सागर कारंडे एका अनोळख्या व्हॉट्सअॅप नंबरवरून एका महिलेचा संदेश आला. या महिलेने टेलीग्राम आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर एक इंस्टाग्राम लिंक पाठवली आणि सांगितलं की, प्रत्येक लाईकसाठी १५० रुपये मिळतील. यामुळे घरबसल्या चांगले पैसे कमावता येतील, असा दावा करण्यात आला.

ईडीने नऊ महिने आत ठेवलेल्यांनी बोलताना भान ठेवावे; राष्ट्रवादीचा प्रवक्ता राऊतांवर बरसला

सुरुवातीला हा प्रकार सत्य वाटला आणि सागर कारंडेंनी हे काम करण्यास सहमती दर्शवली. त्यांनी लिंकवरील पोस्ट लाईक करण्यास सुरुवात केली आणि काही दिवसांतच ११,००० रुपयांचं पहिलं दहा व्यवहार त्यांना मिळाले. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी हा उपक्रम पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान, सागर कारंडेंच्या विश्वासाचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांनी त्यांना अधिक कमाईसाठी गुंतवणूक करण्यास भाग पाडलं. सुरुवातीला कमी रकमेची गुंतवणूक करून त्यांना दिलासा देण्यात आला. मात्र, नंतर मोठ्या रकमांची मागणी केली जाऊ लागली.

१) कमी गुंतवणुकीत मोठ्या रकमेचे आमिष

सागर कारंडे यांनी सुरुवातीला लहान रक्कम गुंतवली आणि त्यांना मिळालेला नफा घोटाळेबाजांनी तयार केलेल्या वॉलेटमध्ये जमा केला. काही काळानंतर त्यांनी २७ लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना सांगण्यात आले की, “८०% काम पूर्ण झाले आहे, पैसे काढण्यासाठी १००% काम पूर्ण होणे गरजेचे आहे.”

२) आणखी गुंतवणुकीसाठी दबाव

पुढील टप्प्यात सागर कारंडेंना सांगण्यात आलं की, काम पूर्ण करण्यासाठी १९ लाख रुपये अधिक गुंतवावे लागतील. त्यानंतरही त्यांना सांगण्यात आलं की, ३०% कर भरावा लागेल, अन्यथा पैसे काढता येणार नाहीत. अशा प्रकारे सागर करांडेंकडून ६१.८३ लाख रुपये उकळण्यात आले.

शेवटी लक्षात आला फसवणुकीचा प्रकार

एवढ्या मोठ्या रकमेची गुंतवणूक केल्यानंतरही सागर कारंडेंना पैसे परत मिळाले नाहीत. यावर “कर चुकीच्या खात्यात जमा झाला आहे” असं कारण सांगून त्यांच्याकडून आणखी पैसे मागण्यात आले. त्यावेळी सागर कारंडेंना संशय आला आणि त्यांनी तातडीने सायबर पोलीस हेल्पलाइनवर संपर्क साधून तक्रार दाखल केली.

सायबर गुन्हेगारांपासून कसे वाचावे?

सायबर तज्ज्ञांच्या मते, सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी खालील गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात.

-अनोळखी नंबरवरून आलेल्या लिंकला क्लिक करू नका.
-“घरबसल्या लाखो रुपये कमवा” अशा जाहिरातींना बळी पडू नका.
-ऑनलाइन व्यवहार करताना अधिकृत वेबसाइट किंवा अॅपचा वापर करा.
-संपर्क साधणाऱ्या व्यक्तीचा विश्वासार्हता तपासा.
-कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारासाठी OTP, बँक डिटेल्स शेअर करू नका.
-सायबर गुन्हेगारांची शिकार झाल्यास त्वरित सायबर क्राईम हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधा.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube