ईडीने नऊ महिने आत ठेवलेल्यांनी बोलताना भान ठेवावे; राष्ट्रवादीचा प्रवक्ता राऊतांवर बरसला

ईडीने नऊ महिने आत ठेवलेल्यांनी बोलताना भान ठेवावे; राष्ट्रवादीचा प्रवक्ता राऊतांवर बरसला

Anand Paranjape On Sanjay Raut : बाबरी मस्जिद शिवसैनिकांनी पाडली याचा अभिमान आहे असं बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) म्हणत होते मात्र आता शिवसेना (Shiv Sena) काँग्रेसच्या चरणी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अर्पण केली आहे. आम्ही पण तसे शब्द वापरू शकतो पण आमच्यावर ते संस्कार नाही. पत्राचल आणि ईडीमध्ये 9 महिने आत राहिलेल्याने बोलताना भान ठेवावे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे (Anand Paranjape) यांनी आज माध्यमांशी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर केली.

खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्यावर जोरदार टीका केली होती या टीकेला प्रत्युत्तर म्हणून आज माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी वक्फ विधेयकावर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट करत संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला.

यावेळी आनंद परांजपे म्हणाले की, शिव शाहू आंबेडकरांची विचारधारा आम्ही सोडली नाही. वक्फ प्रॉपर्टी नियोजन करण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने विधेयक आणले आहे आणि प्रॉपर्टी चांगल्या पद्धतीने मॅनेजमेंट व्हावे, रोजगार शिक्षण यांच्यासाठी वापर व्हावे यासाठी विधेयक सरकारने विधेयक आणले आहे असं आनंद परांजपे म्हणाले. तसेच राष्ट्रवादीने विधेयकाच्या बाजून भूमिका घेतली आहे पण शिवसेना उबाठा ही मात्र गोंधळलेला परिस्थितीत आहे. असेही यावेळी आनंद परांजपे म्हणाले.

‘माझ्या नादाला लागू नको’, नागडा करेन; राऊतांच्या धमकीनंतर प्रफुल पटेलांची प्रतिक्रिया समोर…

तसेच दाऊद प्रकरणात प्रफुल पटेल यांची चौकशी पण झाली नाही मात्र स्वतः मात्र बेलवर बाहेर आहे असा टोला देखील त्यांनी यावेळी संजय राऊतांना लावला. तसेच रोज जे शिवसेनेचे पतन होत आहे याच्या वैफल्यातून संजय राऊत यांच्या मानसिक संतुलन बिघडले असल्याची टीका देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना केली. तर वक्फ विधेयकेवर मतदान होत होते तेव्हा पवार साहेब का गैरहजर होते? ही न कळण्याइतके लोक मूर्ख नाही असेही ते म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube