Download App

धनंजय महाडिकांची पूर्ण फॅमिली नरेंद्र मोदींच्या भेटीला…

Dhananjay Mahadik Meets Narendra Modi : राज्यसभेतील निवडीनंतर आज पहिल्यांदाच खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची सहकुटुंब भेट घेतली. भाजपकडून राज्यसभेवर संधी दिल्याबद्दल त्यांनी मोदींचे आभार मानले. तर मोदी यांनीही महाडिक यांचे अभिनंदन केले. मोदी यांनी महाडिक कुटुंबियातील सदस्यांशीही आत्मियतेने संवाद साधला.

गुलाबराव पाटलांनी सांगितला, ‘1992 आणि आताच्या अयोध्या दौऱ्यातील फरक’

यावेळी महाडिक यांनी काही मागण्यांचे निवेदन पंतप्रधान मोदी यांना दिले. सातारा, पंढरपूर, करुळ, कामटी हा सोलापूर जिल्ह्यातील रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करावा. कोल्हापूर शहरातून रत्नागिरीला जाणारा महामार्ग जातो. त्यामुळे कोल्हापूर शहरात सुमारे सात किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारावा, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोल्हापूर शहराबाहेरून जाणारा 65 किलोमीटर लांबीचा नवा रिंग रोड तयार करावा.

या कामांची जबाबदारी राष्ट्रीय राजमार्ग अशी विनंती खासदार महाडिक यांनी निवेदनात केली आहे. यावेळी खासदार महाडिक यांच्या पत्नी अरुंधती महाडिक, सुपुत्र पृथ्वीराज, विश्वराज, कृष्णराज तसेच स्नुषा वैष्णवी आणि नातू अमरेंद्र असे महाडिक कुटुंबिय उपस्थित होते.

दरम्यान, खासदार महाडिक यांना भाजपने संधी दिली होती. महाडिक यांनीही या संधीचे सोने करत विजय मिळवला. त्यांनी या निवडणुकीत संजय पवार यांचा पराभव केला होता. महाडिक यांना 41 ते संजय पवार यांना 33 मते मिळाली होती. त्यानंतर धनंजय महाडिक आणि संजय पवार यांच्यात चुरशीची लढत निर्माण झाली होती. पण, दुसऱ्या पसंतीची मतं महाडिक यांना जास्त मिळाल्याने त्यांचा या निवडणुकीत विजय झाला.

 

Tags

follow us