Download App

Mahua Moitra : ‘घाणेरडे प्रश्न विचारले…’, मोईत्रा यांचे एथिक्स कमिटीवर आरोप, विरोधकांनी केला सभात्याग

  • Written By: Last Updated:

Mahua Moitra Case : गुरुवारी संसदीय एथिक्स कमिटीच्या बैठकीचा तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्र (Mahua Moitra) आणि बसपा खासदार दानिश अली यांच्यासह विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभात्याग केला. प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपावरून समितीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आलेल्या महुआ मोईत्रा यांनी एथिक्स कमिटीवर (Ethics Committee) समितीवर ‘घाणेरडे प्रश्न’ विचारल्याचा आरोप केला.

मोईत्रा कॅश फॉर क्वेरी आरोपासंदर्भात एथिक्स कमिटीसमोर हजर झाल्या होत्या. मात्र, या बैठकीत बराच गदारोळ झाला. महुआ मोईत्रा यांना वैयक्तिक प्रश्न विचारण्यात आले होते.

तुम्ही किती वाजता भेटलात, कधी कोणाशी बोललात, हॉटेलमध्ये कोणाला भेटलात, असे प्रश्न मोईत्रा यांना विचारण्यात आल्याचं विरोधी सदस्यांनी सांगितले. त्यामुळं विरोधी खासदारांनी समितीची बैठक अर्धवट सोडून सभात्याग केला.

सभात्याग केल्यानंतर मोईत्रा यांनी जोरदार टीका केली. ही आचारसंहिता समिती आहे का?… हे तर स्क्रिप्टमधून वाचत आहेत, असा गंभीर मोईत्रा यांनी केला.

मोईत्रा यांनी उलट सुलट बोलणाऱ्या पत्रकारांनाही फटकारले. माझ्या डोळ्यात अश्रू नाहीत… उगाच तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत असे म्हणू नका. तुम्ही माझे डोळे पाहिलेत का? त्यात अश्रू आहेत का?’, असा सवाल त्यांनी यावेळी केला.

Pune : हवेली तहसीलदारांवरील ताण कमी होणार; लोणी काळभोरला अप्पर तहसील कार्यालय मंजूर 

समितीच्या बैठकीतून बाहेर पडलेल्या विरोधी पक्षाच्या खासदारांनी सांगितले की, समितीने मोईत्रा यांना अनैतिक प्रश्न विचारले.

काँग्रेस खासदार आणि समितीचे सदस्य एन उत्तम कुमार रेड्डी यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, आम्हाला आचार समिती अध्यक्षांनी मोईत्रा यांना विचारलेले प्रश्न चुकीचे आणि अनैतिक वाटले. या सर्व प्रश्नांवरून असे दिसते की ते (संसदीय आचार समितीचे अध्यक्ष) कोणाच्या तरी इशाऱ्यावर काम करत आहेत. हे खूप वाईट आहे. ते अत्यंत खाजगी प्रश्न विचारत आहेत. तुम्ही कुठे प्रवास करता? तुम्ही कुठे भेटतात? तुम्ही आम्हाला तुमचे फोन रेकॉर्ड देऊ शकता का? असले प्रश्न विचारल्या जात आहेत.

तर जनता दल (युनायटेड) खासदार गिरीधारी यादव म्हणाले की पॅनेलला महुआ मोईत्रा यांना वैयक्तिक प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही.

एथिक्स कमिटीने मोईत्रा यांना का बोलावलं?
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी 15 ऑक्टोबर रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं होतं. मोईत्रा यांनी अदानी समूह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्यासाठी उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे आणि भेटवस्तू स्वीकारल्याचा आरोप या पत्रातून केला होता. लोकसभा अध्यक्षांनी हे प्रकरण एथिक्स समितीकडे पाठवले होते. महुआ मोइत्राचा संसदीय लॉगिन आयडी दुबईत असताना उघडण्यात आल्याचा आरोपही निशिकांत यांनी केला आहे. यानंतर आचार समितीने महुआ मोईत्रा यांना बोलावले.

Tags

follow us