Download App

‘ऑपरेशन लोटसवर ऑपरेशन लालटेन भारी पडणार! राजदच्या दाव्याने बिहारमध्ये वाढले राजकीय तापमान

पाटना : बिहारमध्ये उद्या (12 फेब्रुवारी) बहुमत चाचणी होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर बिहारमधील (Bihar) राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी संयुक्त जनता दलाकडे भाजपच्या (BJP) साथीने पूर्ण बहुमत असले तरीही दोन्ही पक्षांकडून आमदारांना सुरक्षित आणि संपर्कामध्ये ठेवले जात आहे. त्याचवेळी राष्ट्रीय जनता दलाने (RJD) उद्याच्या बहुमत चाचणीत नितीश कुमारांचा पराभव करण्यासाठी डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. सध्या दोन्ही बाजूंनी डिनर डिप्लोमसी सुरु आहे. (Majority test will be held in Bihar tomorrow political developments have gained momentum)

नितीश कुमार यांच्या सरकारमधील मंत्री विजय कुमार चौधरी यांच्या घरी आज संयुक्त जनता दलाच्या विधीमंडळ पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीनंतर आमदारांसाठी भोजनाचेही आयोजन करण्यात आले आहे. या भोजनाला मुख्यमंत्री नितीशकुमारही उपस्थित राहणार आहेत. काल मंत्री श्रावण कुमार यांच्या घरीही आमदारांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या जेवणाला 45 पैकी केवळ 39 आमदार उपस्थित होते. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. मात्र न आलेल्या सहा आमदारांशी चर्चा झाल्याचे आणि वैयक्तिक कारणामुळे ते उपस्थित राहू शकले नसल्याचे विजय चौधरी यांनी सांगितले होते. तसेच आजच्या जेवणाला सर्व आमदार येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Congress : PM मोदींचं कौतुक अन् काँग्रेस विरोधात वक्तव्य; मोठ्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी

त्याचवेळी राष्ट्रीय जनता दलाचे नेते मृत्युंजय तिवारी यांनी एका वृत्तसंस्थेसोबत बोलताना दाव केला की, ‘आमच्या सर्व आमदारांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वजण एकत्र राहतील. हे सरकार म्हणजे आता 24 तासांचा पाहुणा आहे. ऑपरेशन लोटसवर ऑपरेशन लालटेन (राजदचे चिन्ह कंदील) मागे टाकेल. राजदने प्रमुख नेते तेजस्वी यादव यांच्या घरी आमदारांसाठी जेवणाचे आयोजन केले आहे. याशिवाय काँग्रेसचेही सर्व आमदार आज रात्रीपर्यंत पाटना येथे परतणार आहेत. काँग्रेसचे काही आमदार भाजपच्या आणि राष्ट्रीय जनता दलाच्या संपर्कात असल्याच्या बातम्या गत आठवड्यात ऐकायला मिळाल्या होत्या. त्यामुळे या आमदारांशीही सर्व वरिष्ठ नेते संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे.

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाईंची पत्नी होणार खासदार; सागरिका घोष यांना राज्यसभेचे तिकीट

243 सदस्यसंख्या असलेल्या बिहार विधानसभेत बहुमताचा आकडा 122 आहे. सध्या विधानसभेत राजदचे 79, काँग्रेसचे 19 आणि डाव्या पक्षांचे 16 आमदार आहेत. या सर्वांचे मिळून 114 आमदार होतात. तर भाजपचे 78, नितीश कुमार यांचे 43, हम पक्षाचे चार आणि एका अपक्ष आमदारासह एकूण 128 आमदार होत आहेत. मात्र हे अगदीच काठावरचे बहुमत असल्याने भाजप आणि जनता दलाकडून काळजी घेतली जात आहे. याशिवाय राजदला बहुमतासाठी आठ आमदार कमी पडत आहेत. त्यामुळेच त्यांनी हम पक्षाशी संपर्क केला असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता विधानसभेत नेमके काय होते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us

वेब स्टोरीज