मालदीवची ट्रीप कॅन्सल करा अन् ‘छोले भटूरे’ची ट्रीट घ्या; उत्तर प्रदेशच्या हॉटेल व्यवसायिकाची ऑफर

Maldives Trip : सध्या मालदीवच्या तिकीट बुकिंग प्रकरणानंतर (Maldives trip) आता उत्तर प्रदेशातील एका हॉटेलने मालदीवचं तिकीट रद्द करणाऱ्यांसाठी एक योजना आखली आहे. प्रवाशांनी तिकीट बुकींग रद्द केल्यानंतर छोले भटुरेची मोफत ट्रीटची सुविधा सुरु केली आहे. यामध्ये प्रवाशांनी तिकीट बुकींग केलं असेल तर पोर्टलवर जाऊन तिकीट रद्द करायचं आहे, त्या प्रवाशांसाठी ही योजना हॉटेल व्यवसायिकाने […]

Maldives Trip

Maldives Trip

Maldives Trip : सध्या मालदीवच्या तिकीट बुकिंग प्रकरणानंतर (Maldives trip) आता उत्तर प्रदेशातील एका हॉटेलने मालदीवचं तिकीट रद्द करणाऱ्यांसाठी एक योजना आखली आहे. प्रवाशांनी तिकीट बुकींग रद्द केल्यानंतर छोले भटुरेची मोफत ट्रीटची सुविधा सुरु केली आहे. यामध्ये प्रवाशांनी तिकीट बुकींग केलं असेल तर पोर्टलवर जाऊन तिकीट रद्द करायचं आहे, त्या प्रवाशांसाठी ही योजना हॉटेल व्यवसायिकाने आणली आहे. या सुविधेचा मोठा बॅनरच हॉटेलमध्ये लागल्याचं दिसून आलं आहे.

‘वंचित’चा इंडियात समावेश होणार? राहुल गांधींनी पाठवलं निमंत्रण, आंबेडकरांनी ठेवली ‘ही’ अट

अलीकडच्या काळातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीव दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान बिचवर काढण्यात आलेले छायाचित्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर शेअर करीत पर्यटकांनी मालदीवला भेट देण्याबाबतच आवाहन केलं होतं. त्यानंतर मालदीवच्या काही मंत्र्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवली गेली. त्यानंतर मालदीवला जाणाऱ्या पर्यटकांनी आपलं तिकीट बुकींग रद्द केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर आता पुन्हा हे प्रकरण चव्हाट्यावर आणून उत्तर प्रदेशच्या हॉटेल व्यवसायिकाने मालदीव तिकीट रद्द करणाऱ्या प्रवाशांना अनोखी ऑफर दिली आहे.

मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना ही कल्पना सुचली. आम्ही शनिवारी ही योजना सुरू केली आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. एनसीआर भागातच 10 लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आणि त्यांनी त्याचे कौतुक केले. आम्ही आता या योजनेचा विस्तार करण्याचा विचार करत असल्याचं जानेवारीच्या अखेरपर्यंत, नोएडास्थित हॉटेलचे मालक विजय मिश्रा यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले आहे.

… अन् अभिनेत्रींच्या प्रेमात पडले जावेद अख्तर, साधेपणावर भाळल्याने केले प्रपोज, क्यूट लव्ह स्टोरी

मागील दोन आठवड्यांत मालदीवच्या अनेक हॉटेल बुकिंग आणि फ्लाइट तिकिटे रद्द झाल्याची नोंद झाली आहे. दुसरीकडे, लक्षद्वीपच्या अगाटी बेटांवरची सर्व विमान तिकिटे मार्चपर्यंत विकली गेली. हे सर्व पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीपच्या दौऱ्यामुळे सुरु झाले. इंटरनेटवरील चॅटर आणि काही मीडिया रिपोर्ट्सने लक्षद्वीपला मालदीवचा काउंटर म्हणून पर्यटनस्थळ म्हणून प्रचार केला. मालदीवच्या तीन खासदारांनी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पण्या पोस्ट केल्या होत्या.

उत्तर प्रदेशानंतर आता हैदराबादमधील एका रिअल इस्टेट फर्मच्या योजनेत तेलंगणामध्ये एखाद्याने शेत प्लॉट खरेदी केल्यास किंवा फ्लॅट बुक केल्यास लक्षद्वीपला मोफत सहलीचे आश्वासन दिले आहे. लक्षद्वीपला मोफत सहल हवी आहे? शेत प्लॉट किंवा रहिवासी प्लॉट खरेदी करा आणि विनामूल्य सहलीचा आनंद घ्या! अंदमान आणि निकोबार सारख्या भारतीय बेटांचे सौंदर्य एक्सप्लोर करा,” अशी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलीयं.

दरम्यान, पर्यटनातून मालदीव किती कमाई करत आहे आणि त्यांनी आज भारतासोबत काय केले हे तुम्ही पाहिले आहे. आम्ही जवळपास 50 फ्लॅट्स विकले आहेत. आम्ही या 50 लोकांना जानेवारी ते मार्च दरम्यान दौऱ्यासाठी घेऊन जाण्याचा विचार करत असल्याचं फर्मचे अध्यक्ष, रमेश यांनी स्पष्ट केलं आहे.

Exit mobile version