Download App

Mallikarjun Kharge …असे का म्हणाले राहुल गांधीबाबत….’डर मुझे लगा फासला देख कर…

जम्म -काश्मिर : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जेव्हा कन्याकुमारी ते काश्मिर अशी ‘भारत जोडो’ (Bharat Jodo) यात्रा करण्याचा निर्णय सांगितला. तेव्हा आम्ही थोडेसे घाबरलो होतो. हे कसे यशस्वी होईल, याची आम्हाला खात्री नव्हती. कारण एवढा लांबचा प्रवास कसा होणार, याबाबत मला असे वाटले होते की, ‘डर मुझे लगा फासला देख कर… पर मैं बढता गया रास्ता देख कर… खुद ब खुद मेरे नजदीक आती गई! मेरी मंजिल… मेरा हौसला देख कर,’ असेच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेबद्दल म्हणावे लागेल, असे काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.

जम्मू-काश्मिरमधील लाल चौकात भारत जोडो यात्रेच्या समारोप प्रसंगी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे बोलत होते. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ‘भारत जोडो’ (Bharat Jodo) यात्रा ही निवडणूक डोळयासमोर ठेवून केलेली नाही. तर सत्ताधारी भाजप (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) लोकं देशात द्वेष पसरवत आहे. ती नष्ट करण्यासाठी आणि त्याविरोधत न घाबरता लढण्यासाठी काढण्यात आली होती. सत्ताधारी भाजपकडून गेल्या काही वर्षात देशात जे द्वेषाचे (नफरत) वातावरण तयार केले जात आहे. ते द्वेषाचे वातावरण मिटवण्यासाठी ‘भारत जोडो’ यात्रा काढण्यात आली होती, अशी टीका काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी केंद्र सरकारवर केली.

खर्गे म्हणले की, छोट्या दुकानदारांसह शेतकरी, कामगार, महिला, शाळेतील मुलांसह ते ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच नागरिकांच्या समस्या, त्यांचं म्हणणे या ‘भारत जोडो’ यात्रेतून राहुल गांधी यांनी प्रत्यक्ष समजून घेतले, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे विमानातून फिरत आहे. त्यांना इथल्या लोकांचे प्रश्न, समस्या, हाल, दुःख याच्याशी काही देणं-घेणं नाही. त्यांचे फक्त आपल्या दोन मित्रांना कोट्यधीश बनवण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी रात्रंदिवस ते काम करत आहेत. राहुल गांधी हे माञ, ऊन, वारा, पाऊस अशी कश्याचीच परवा न करता कन्याकुमारी ते काश्मिर असे चालत लोकांना जोडत गेले. आज काश्मिरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत असतानाही ते डगमगले नाहीत.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत हजारो लोक जोडत गेले. आज या यात्रेचा समारोप काश्मिरमध्ये असताना सांगतो की, काश्मिरमधील लोकं फार सगळ्यात जास्त उदार, निरपेक्ष आहेत. आपल्यासाठी ही काश्मिरमधील लोकांची फार मोठी जमेची बाजू आहे, देन आहे, असे देखील मल्लिकार्जुन खर्गे यावेळी म्हणाले.

Tags

follow us