गंगेत डुबकी मारल्याने गरिबी दूर होईल का?, कुंभ मेळ्यातील स्नानावरून खर्गेंचा थेट अमित शाहांना सवाल

जर गरिबी आणि बेरोजगारीपासून मुक्ती हवी असेल तर संविधानाचे रक्षण करा, गंगेत डुबकी मारून गरिबी दूर होणार नाही.

Mallikarjun Kharge

Mallikarjun Kharge

Mallikarjun Kharge : देशाचे गृहमंत्री अमित शा (Amit Shah) हे प्रयागराज (Prayagraj) येथे सुरु असलेल्या महाकुंभात (Mahakumbh) सहभागी झाले. त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यासह गंगेत स्नान केलं. यावरून कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंनी (Mallikarjun Kharge) शाह यांच्यावर टीका केली. भाजप नेत्यांमध्ये गंगेत डुबकी मारण्याची स्पर्धा सुरू आहे. पण गंगेच डुबकी मारून गरिबी दूर होणार नाही, असं खर्गे म्हणाले. एवढेच नाही तर, आरएसएस आणि भाजप हे देशद्रोही आहेत, असंही ते म्हणाले.

‘पॉकेट में आसमान’ आणि ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ चा एकत्र भाग, समृद्धी शुक्ला म्हणते… 

मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी (२७ जानेवारी) मध्य प्रदेशातील महू येथे ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ रॅलीला संबोधित केले. यावेळी खर्गेंनी भाजप नेत्यांवर टीका केली. ते म्हणाले, ‘मोदी आणि शाह यांनी मिळून इतके पाप केले आहे की ते सात जन्मातही स्वर्गात जाणार नाहीत. भाजपचे लोक मशिदीखाली मंदिर शोधत आहेत, शिवलिंग शोधत आहेत. एकीकडे भागवत म्हणत आहेत की, असं करू नका आणि दुसरीकडे ते असेच करत आहेत. आज भाजप-आरएसएसचे लोक काँग्रेसबद्दल वाईट बोलत आहेत. पण त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी काहीही केले नाही. हे लोक स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांसोबत होते. ते ब्रिटिशांसाठी काम करत होते. स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे कोणतेही योगदान नाही. त्यामुळं तु्म्हाला एकत्र येऊन या लोकांना धडा शिकवावा लागे आणि तुमच्या हक्कांचे रक्षण करावे लागेल, असं खर्गे म्हणाले.

Ahilyanagar Crime : प्रियकर-प्रेयसी एकांतात भेटले, भामट्यांनी एक लाखांना लुटले… 

गंगा स्नानाबद्दल बोलताना खर्गे म्हणाले, अरे भाऊ, गंगेत डुबकी मारल्याने गरिबी दूर होते का? तुम्हाला जेवण मिळते का? मला कोणाच्याही भावना दुखावायच्या नाहीत. जर कोणी दुखावले असेल तर मी माफी मागतो. पण तुम्ही मला सांगा, एखादा मुलगा उपासमारीने मरत असेल, तो शाळेत जाऊ शकत नसेल, मजुरांना मजुरी मिळत नसेल… अशी परिस्थितीत या लोकांची हजारो रुपये खर्च करून डुबकी मारायची स्पर्धा सुरू झाली. अशा लोकांपासून देशाला फायदा होऊ शकत नाही. जोपर्यंत टीव्हीवर व्यवस्थित दिसत नाही, तोपर्यंत ते डुबकी घेत राहतात, असं खर्गे म्हणाले.

जर गरिबी आणि बेरोजगारीपासून मुक्ती हवी असेल तर संविधानाचे रक्षण करा, असंही खर्गे म्हणाले.

दरम्यान, खर्गेंच्या विधानावर भाजप खासदार संबित पात्रा म्हणाले,”ते इतर कोणत्याही धर्माबद्दल असे बोलू शकतात का? सनातन धर्माविरुद्ध असे शब्द आणि विधाने निंदनीय आहेत. काँग्रेस पक्षाने यावर स्पष्टीकरण द्यावे. आपण सत्तेत आलो तर सनातन संपून टाकू, असं म्हणणारे हे तेच खर्गे आहेत.

Exit mobile version