आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वच पक्षांच्या जोरदार हालचाली सुरु आहेत. अशातच आता इंडिया आघाडीतून बाहेर पडून स्वबळावर निवडणूका लढवणार असल्याचं ममता बॅनर्जींनी जाहीर केलं आहे. त्यानंतर गाडीतून जात असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये ममता बॅनर्जी जखमी झाल्या असून अपघातातून बॅनर्जी बचावल्या आहेत.
Budget 2024 : यंदाच्या अर्थसंकल्पात नोकरदार वर्गाला पाच अपेक्षा; सर्वांच्या नजरा खिळल्या…
नेमकं काय घडलं?
वर्धमानहून ममता बॅनर्जी यांची गाडी जात असतानाच रस्त्यावरील दुसऱ्या वाहनाला त्यांची गाडी धडकणार होती. दुसऱ्या गाडीला धडक बसू नये म्हणून बॅनर्जी यांच्या गाडीचालकाने अचानक ब्रेक मारला. अचानकपणे ब्रेक मारल्याने ममता बॅनर्जी गाडीतच जखमी झाल्या होत्या. गाडीचालकाने सतर्क राहुन अचानक ब्रेक मारल्याने पुढील अनर्थ टळला. गाडीचालकाने प्रसंगावधान दाखवले नसते तर ममता यांची गाडी दुसऱ्या गाडीला जोरदार धडकली असती.
INDIA Alliance : ‘ममतांशिवाय ‘इंडिया’ आघाडी शक्य नाही’; स्वबळाच्या घोषणेनंतर काँग्रेस बॅकफूटवर!
ममता बॅनर्जी म्हणाल्या…
माझी कार दुसऱ्या गाडीला धडकणार त्यावेळी गाडीचालकाने सतर्कता बाळगून ब्रेक मारला. अचानक गाडीत ब्रेक मारल्याने माझ्या डोक्याला मार लागला. डोक्याला जोरदार मार बसल्याने डोक्यातून रक्त वाहत होतं. चालकाने ब्रेक लावला नसता तर गाडी दुसऱ्या गाडीला धडकली असते, यादरम्यान माझ्या गाडीची खिडकी उघडी होती. जर गाडीची खिडकी बंद असते तर भीषण अपघात झाला असता. या अपघाता माझा मृत्यूही झाला असता. पण नागरिकांच्या आशिर्वादानेच माझे प्राण वाचले असल्याचं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.
दोन गटांत तुफान राडा, सरकार अॅक्शन मोडमध्ये; मीरा रोडच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर
दरम्यान, अपघातादरम्यान ममता बॅनर्जी या गाडीच्या समोरच्या सीटवर चालकाच्या बाजूला बसलेल्या होत्या. त्यांचं डोकं समोरच्या काचेवर आदळल्याने त्या जखमी झाल्या. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. केंद्रातील सत्ताधारी भाजपविरोधात तयार करण्यात आलेल्या इंडिया आघाडीला ऐन निवडणुकीच्या आघाडीवर जबरदस्त झटका बसला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर ममता बॅनर्जी इंडिया आघाडीतून बाहेर पडणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. जागावाटपाच्या चर्चा निष्फळ ठरल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी ही घोषणा करून इंडिया आघाडीला मोठा धक्का दिला आहे.