बांग्लादेशात हिंदुंवर हल्ले! मी केंद्र सरकारसोबत, ममता बॅनर्जीने ठणकावून सांगितलं

बांग्लादेशातील हिंदुंवरील हल्ल्याच्या मुद्द्याबाबत मी केंद्र सरकारच्यासोबत असल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ठणकावून सांगितलंय.

Untitled Design

Mamata Banerjee : मागील काही दिवसांपासून बांग्लादेशात हिंदु समुदायावर हल्ले (Bangladesh Violence) करण्याचे प्रकार घडत आहेत. बांग्लादेशातील हिंदू नेते चिन्मय कृष्ण दास ब्रम्हचारी यांना पोलिसांनी अटक केलीयं. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आपली भूमिका स्पष्ट करीत बांग्लादेशातील हिंदुंवरील हल्ल्याच्या मुद्द्याबाबत मी केंद्र सरकारच्यासोबत असल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ठणकावून सांगितलंय.

श्रीकांत शिंदे राज्याचे नवे उपमुख्यमंत्री? शिंदेच्या प्रस्तावावर भाजपची काय भूमिका?

ममता बॅनर्जी म्हणाल्या, जेव्हा दुसऱ्या देशांसंदर्भातील गोष्ट समोर येईल तेव्हा आम्ही केंद्र सरकारसोबत ठामपणे उभे राहणार आहोत. जर कोणत्याही धर्माच्या लोकांवर अत्याचार होत असेल तर त्याची आम्ही निंदा करीत असून बांग्लादेशात कोणत्या धर्माच्या लोकांवर अत्याचार होत असेल तर आम्ही त्याचं समर्थन करीत नाही. बांग्लादेशात हिंदू नेता चिन्मय कृष्ण दास ब्रम्हचारी यांना अटक करण्यात आलीयं. यासंदर्भात मी इस्कॉनच्या प्रमुखांशी चर्चा केलीयं. हे प्रकरण दुसऱ्या देशातील असल्याने केंद्र सरकारने त्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे, या मुद्द्यावरुन आम्ही केंद्र सरकारसोबत ठामपणे उभे असल्याचं ममता बॅनर्जी यांनी सांगितलंय.

‘गरज सरो, वैद्य मरो, भाजपने लाडक्या भावाकडे दुर्लक्ष…; सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असतानाच बच्चू कडूंचे विधान

हिंदू समुदायाचे नेते चिन्मय ब्रम्हचारी यांना ढाकाच्या शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमातळावर अटक करण्यात आलीयं. या विरोधात बंगालसह इतर भागांत आंदोलने सुरु आहेत. बांग्लादेशात होत असलेले हिंदुवरील हल्ल्यांचा निषेध करीत असून केंद्र सरकारने त्यावर कारवाई करायला हवी, अशी मागणी तृणमूल कॉंग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी केलीयं. तसेच बांग्लादेशात काही घटना घडल्या आहेत, हे दुर्देवी असून केंद्र सरकारने निर्णायक कारवाई केला पाहिजे, असंही बॅनर्जी म्हणाले आहेत.

विधानसभेचा निकाल मान्य नाही, ईव्हीएममुळेच महायुती जिंकली…; मनसे नेत्याचा गंभीर आरोप

दरम्यान, काँग्रेसचे नेते गौरव गोगोई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून भारताचा शेजारील देशांमध्ये प्रभाव कमी होत चालला असून बांग्लादेशात हिंदु समुदायाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प आहेत, अशी टिप्पणी गोगोई यांनी केलीयं.

follow us