Mamata Banerjee another Shock after Party split ED raids on Abhishek Banerjee’s House : पश्चिम बंगालमधील सत्ता गेल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्यासोबत देखील तेच झालं आहे. जे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे अन् शरद पवारांसोबत झालं आहे. ममता यांच्या पक्षामध्ये फुट पडली आहे. तर यानंतर त्यांना दुसरा धक्का बसला आहे तो म्हणजे तृणमूल चे खासदार आणि ममता यांचे भाचे असलेले अभिषेक बॅनर्जी यांच्या कोलकात्यातली घरावर ईडीने धाड टाकली आहे. ईडीच्या चार टीम्स अभिषेक यांच्या घरी पोहचल्या आहेत.
अभिनेता आमीर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; कोण आहे होणारी पत्नी गौरी?
एकीकडे पक्षामध्ये मोठी फुट पडल्यानंतर आता भाचा अभिषेक बॅनर्जींच्या घरी ईडीच्या चार टीम्स धडकल्या आहेत. त्यामुळे हा ममतांना मोठा धक्का मानला जात आहे. अभिषेक ह तृणमुलचे खासदार आहेत. त्यांच्या कोलकात्यातली ईडीच्या चार टीम्सने धाड टाकली गेली आहे. त्यामुळे आता त्यांच्या घरात नेमकं काय सापणार? त्याचबरोबर अभिषेक यांची कोणत्या प्रकरणात चौकशी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हुंड्यासाठी छळ अन् गर्भपातासाठी बळजबरी; पुण्यात २५ वर्षीय विवाहितेची आत्महत्या
श्चिम बंगाल विधानसभेत टीएमसीचे बंडखोर आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांनी परवानगी दिली असून आता विरोधी पक्ष नेते म्हणून ऋतब्रत बॅनर्जी यांची निवड करण्यात आली आहे. तर दुसरीकडे अखरुज्जमान यांची ‘मुख्य प्रतोद’ (Chief Whip) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली, 58 बंडखोर आमदारांनी विधानसभा अध्यक्ष रथिन बोस यांच्याकडे समर्थनाचे पत्र सादर केले. पक्षांतरबंदी कायद्याचा (Anti-defection law) भंग टाळण्यासाठी एकूण 80 आमदारांपैकी किमान 54 आमदारांचा पाठिंबा आवश्यक होता. बंडखोर गटाने 58 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे.
ऋतब्रत बॅनर्जी काय म्हणाले?
ऋतब्रत बॅनर्जी (Ritabrata Banerjee) यांनी सांगितले की, विरोधी पक्षनेत्यासाठी (LoP) राखीव असलेली खोली आता अधिकृतपणे वाटप करण्यात आली आहे. ममता बॅनर्जी यांनीच आपले मार्गदर्शक म्हणून काम करत राहावे आणि आपला सल्ला द्यावा, जेणेकरून विधानसभेत पक्षाचे कामकाज एकत्रितपणे आणि प्रभावीपणे चालवता येईल, अशी या गटाची सामूहिक इच्छा आहे.
क्रिकेटच्या इतिहासात नवीन विक्रम; अवघ्या पाच चेंडूत ‘या’ संघाने मारली बाजी
ऋतब्रत बॅनर्जी यांनी ठामपणे सांगितले की, आज पक्ष ज्या बिकट अवस्थेत सापडला आहे, त्याला काही अंशी अभिषेक बॅनर्जी यांचे अपयशच कारणीभूत आहे. त्यांनी असा युक्तिवाद केला की, जेव्हा गोष्टी सुरळीत चालतात तेव्हा जर अभिषेक बॅनर्जी त्याचे श्रेय घेत असतील, तर जेव्हा गोष्टी बिघडतात तेव्हा त्यांनी त्याची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे.
नुकतंच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीचा दारुण पराभव करत भाजपने पहिल्यांदाचा राज्यात सरकार स्थापन केली आहे. या निवडणुकीत टीएमसीला फक्त 80 जागा जिंकता आल्या आहेत तर भाजपने 200 पेक्षा जास्त जागा जिंकत पहिल्यांदा सरकार स्थापन केली आहे.
