Download App

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा अपघात, डोक्याला मोठी दुखापत, रुग्णालयात उपचार सुरू

  • Written By: Last Updated:

Mamata banerjee injured : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. ममता बॅनर्जी या गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे. ममता बॅनर्जी यांच्या कपाळावर मोठी जखम झाल्याची माहिती समोर येत आहे. तृणमूल काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ही माहिती देण्यात आली आहे.

निलेश लंके मुंबईत राहतील की दिल्लीत जाणार? पवारांनी अखेर सांगूनच टाकलं… 

तृणमूल काँग्रेसने सोशल मीडियावर ममता बॅनर्जी यांचे रक्काबंबाळ अवस्थेतील फोटो शेअर केली आहेत. त्यामुळे घटनेचे गांभीर्य वाढले आहे. तृणमूल कॉंग्रेसने केलेल्या ट्विटध्ये ममता बॅनर्जींची प्रकृती बरी व्हावी यासाठी प्रार्थना करा, असं आवाहन करण्यात आलं. लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील उमेदवारही जाहीर केले आहेत. आता बंगालमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. अशाचत ममता दिदली जखमी झाल्या आहेत.

तृणमूलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गुरुवारी कालीघाट गृहसंकुलात फेरफटका मारत होत्या. यावेळी त्या पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव सुरू झाला. त्यामुळं त्यांना तातडीने कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात नेण्यात आले. त्यांचा भाचे अभिषेक बॅनर्जी त्यांना रुग्णालयात घेऊन गेले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती समजातच टीएमसीचे अखिल भारतीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी तेथे पोहोचले आहेत.

निलेश लंके मुंबईत राहतील की दिल्लीत जाणार? पवारांनी अखेर सांगूनच टाकलं… 

जानेवारी महिन्यातही झाला होता अपघात
या वर्षी जानेवारी महिन्यातही ममता यांचा अपघात झाला होता. त्यावेळी त्या वर्धमानहून कोलकात्याला परतत होत्या. ममता बॅनर्जी पावसामुळे कारने परतत होत्या. मात्र, अचानक ममता यांच्या ताफ्यात दुसरी कार आल्याने चालकाला अचानक ब्रेक लावावा लागल्याचे सांगण्यात आलं होतं. त्यावेळी अचानक ब्रेक मारल्यानं ममता बॅनर्जी गाडीच्या काचेवर आदळल्या होत्या. यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली.

follow us