Manipur : मणिपूरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई; चकमकीत 11 संशयित दहशतवाद्यांचा खात्मा

मणिपुरमधील जिरीबाम जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी 11 संशयित दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

Manipur

Manipur

Manipur Violence : मणिपुरमधील जिरीबाम जिल्ह्यात 11 संशयित दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश मिळालंय.जिरीबाम भागात सुरक्षा दलाकडून शोध मोहिम सुरु असतानाच ही कारवाई करण्यात आलीयं.यासंदर्भातील वृत्त एएनआयकडून देण्यात आलंय.

दुपारी साडेतीनच्या सुमारास जिरीबाममधील बोरोबेकरा भागात काही दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या कॅम्पवर हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला. या घटनेनंतर सुरक्षा दलाकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय. या चकमकीत 11 संशयित दहशतवाद्यांचा खात्म करण्यात आलायं. या चकमकीनंतर दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलाच्या जवानांनी 4 एसएलआर रायफल, 3 एके 47, 1 आरपीजी रॉकेट यांसह दारुगोळा जप्त करण्यात आलायं.

प्रतिक्षा संपली! पुष्पा 2 चित्रपटाचा ट्रेलर लवकरच चाहत्यांच्या भेटीला, ‘या’ दिवशी होणार लॉन्च

दरम्यान, या घटनेनंतर डीजीपी राजीव सिंह म्हणाले, सध्याचा हा आव्हानात्मक काळ असून आमच्याकडे असलेल्या सर्वोत्तम ताकदीने आणि सर्वांच्या सहकार्याने आम्हाला सामना करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सिंह म्हणाले आहेत.

Exit mobile version