मणिपूर हादरलं! माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर रॉकेट हल्ला; एकाचा मृत्यू, पाच जखमी

मणिपूर हादरलं! माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर रॉकेट हल्ला; एकाचा मृत्यू, पाच जखमी

Manipur Violence : मणिपुरातील हिंसाचाराच्या घटना अजूनही थांबलेल्या (Manipur Violence) नाहीत. सर्वसामान्य माणसेच नाही तर दिग्गज राजकारणी आणि माजी मंत्री देखील सुरक्षित राहिलेले नाहीत. आताही येथे अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर रॉकेटने हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अन्य पाच लोक जखमी झाले आहेत.

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, इम्फाळमध्ये हायटेक ड्रोनने हल्ला, दोन जणांचा मृत्यू, तर 10 जण गंभीर जखमी 

शुक्रवारी दुपारी बिष्णुपूर जिल्ह्यातील मोइरंग भागात (Manipur News) उग्रवाद्यांनी बॉम्बफेक केली. यानंतर जोरदार स्फोट झाला. माजी मुख्यमंत्री मेरेम्बम कोइरंग यांच्या घराच्या परिसरात रॉकेट पडले आणि स्फोट झाला. आता हा दुसरा रॉकेट हल्ला आहे. याआधी याच जिल्ह्यात रॉकेट हल्ला करण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार येथे काही धार्मिक कार्यक्रम सुरू होता. त्याचवेळी बॉम्बचा स्फोट झाला. या स्फोटात एका वयोवृद्ध व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य पाच जण जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये एका तेरा वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. मोबाइल फॉरेन्सिक युनिट, डीएफएस मणिपूरच्या एका पथकाकडून या हल्ल्याचे पुरावे गोळा केले जात आहेत.

मणिपुरातील हल्ल्यांची पद्धत थोडी बदलल्याचे दिसत आहे. ड्रोनचा उपयोग हल्ल्यासाठी करण्यात आल्याचा प्रकार सहा दिवसांपूर्वीच उघडकीस आला होता. त्यानंतर आता रॉकेटने हल्ला झाला आहे. या हल्ल्यात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. आरके रबेई (78) असे या व्यक्तीचे नाव आहे. यानंतर पोलीस दल आणि अतिरिक्त सुरक्षा दलांना या भागात शोध मोहिमेसाठी रवाना करण्यात आले आहे. मुआलसांग गावात दोन तर चुडाचांदपूरमधील लाइका मुआलसौ गावात एक बंकर नष्ट करण्यात आले आहे.

83 वर्षाचा माणूस म्हणतोय मणिपूर होईल, त्यांचा दंगली घडवण्याचा प्रयत्न…; राज ठाकरेंची पवारांवर टीका

पोलीस अधीक्षकांसह बिष्णुपूर जिल्हा पोलिसांचे पथकावर संशयित कुकी उग्रवाद्यांनी गोळीबार केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पोलीस दलानेही जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे हा हल्ला निष्फळ ठरला. आता या भागात हवाई गस्त घातली जात आहे. यासाठी सैन्याचे हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास माजी मुख्यमंत्र्‍यांच्या घरावर इम्प्रोवाइज्ड लाँचरच्या मदतीने रॉकेट हल्ला करण्यात आला. त्यांच्या घराच्या अगदी जवळच रॉकेट पडले आणि स्फोट झाला. या स्फोटात एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube