Parliament Monsoon Session: मणिपूर हिंसाचार आणि ‘इंडिया’च्या वक्तव्यानंतर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमधील वाद टोकाला गेला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना पत्र लिहून मतभेद कमी करण्याचा प्रयत्न केला. पण विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत बुधवारी (26 जुलै) लोकसभेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडणार आहेत.
काँग्रेसने आपल्या लोकसभा खासदारांना 26 जुलै रोजी संसदेत उपस्थित राहण्यासाठी तीन ओळींचा व्हिप जारी केला आहे. यामध्ये सर्व लोकसभा खासदारांना संसदेत उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सकाळी 10.30 वाजता काँग्रेस खासदारांची बैठक होणार आहे. याशिवाय चालू पावसाळी अधिवेशनासाठी ‘आप’चे खासदार संजय सिंह यांच्या निलंबनाबाबत राज्यसभेच्या विरोधी खासदारांचा संसदेच्या आवारात निषेधही सुरू आहे.
Delhi airport ; स्पाइसजेट विमानाला अचानक आग; दिल्ली विमानतळावर गोंधळ
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि अधीर रंजन चौधरी यांना पत्र लिहून संसदेत मणिपूर मुद्द्यावर चर्चेत सहकार्य करण्याची विनंती केली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते खर्गे आणि लोकसभेतील काँग्रेस नेते यांना लिहिलेल्या पत्रांमध्ये अमित शहा म्हणाले की, सरकार मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार आहे आणि पक्षाच्या विचारसरणीच्या वर उठून सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.