Manipur violence Attack On 3 ministers And 6 MLA House : मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा नियंत्रणाबाहेर जात (Manipur violence) असल्याचं दिसतंय. जिरीबाम जिल्ह्यातील सहा बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह नदीत सापडल्यानंतर काही तासांनंतर पुन्हा राज्यात हिंसाचार उफाळला आहे. शनिवारी आंदोलकांनी तीन मंत्री आणि सहा आमदारांच्या घरांवर हल्ला केलाय. यानंतर राज्य सरकारने (House Burnt Of CM Son In Law) पाच जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू केली. तर काही भागांत इंटरनेट सेवा बंद केली. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.
आंदोलकांनी मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या जावई यांच्या घरासह तीन आमदारांच्या घरांची देखील तोडफोड केली. हिंसक जमावाने आमदारांच्या घरांना आग लावली. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला गेला. सोमवारपासून बेपत्ता असलेल्या दोन महिला आणि एका मुलाचे मृतदेह शनिवारी जिरीबाम येथील बारक नदीतून बाहेर काढण्यात आले, तर शुक्रवारी रात्री एक महिला आणि दोन मुलांसह आणखी तीन मृतदेह सापडले. हे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी आसाममधील सिलचर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत.
Manipur Violence : ‘मणिपूरचा इतिहास समजून घ्या’; पंतप्रधान मोदींनी विरोधकांना सुनावलं…
आंदोलकांनी ज्या मंत्र्यांच्या घरांना आग लावली, त्यामध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री सापम रंजन, उपभोग आणि सार्वजनिक वितरण मंत्री एल सुसिंद्रो सिंग आणि नगरविकास मंत्री वाय खेमचंद यांच्या निवासस्थानांचा समावेश आहे. वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने इम्फाळ पूर्व आणि पश्चिम, बिष्णुपूर, थौबल आणि कचिंग जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. आंदोलकांनी इम्फाळ पूर्व जिल्हा ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री एल सुसिंद्रो सिंग यांच्या घरावरही हल्ला केला, त्यानंतर सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या अनेक गोळ्या झाडल्या.
Manipur Violence : हिंसेची धग कायम! बंदूकधाऱ्यांच्या गोळीबारात पिता-पुत्र ठार; तणाव वाढला
इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील सिंगजामाई भागातील नगरविकास मंत्री वाय खेमचंद यांच्या घरालाही आंदोलकांनी लक्ष्य केलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांनी मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांचे जावई असलेले भाजप आमदार आरके इमो यांच्या घरालाही घेराव घातला. आंदोलकांनी आमदारांच्या घराची तोडफोड करून त्यांच्या मालमत्तेची जाळपोळ केली. आंदोलकांनी एमपीएल विधानसभा इमारतीजवळील थांगमेईबंद भागात रस्त्यावर टायर जाळले.
राजभवन आणि मुख्यमंत्री सचिवालयाच्या दिशेने निघालेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. राज्याचे मुख्य सचिव विनीत जोशी यांनी इंफाळ पश्चिम, इम्फाळ पूर्व, बिष्णुपूर, थौबल, कचिंग, कांगपोकपी आणि चुराचंदपूर जिल्ह्यात इंटरनेट आणि मोबाइल डेटा सेवा दोन दिवसांसाठी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.