Manipur violence: मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांनी गृहमंत्री अमित शहा यांना घेरले. यावेळी गृहमंत्र्यांनी विरोधी पक्षांना सद्यस्थितीची माहिती दिली. हिंसाचार रोखण्यासाठी सरकारकडून कोणती पावले उचलली जात आहेत, हेही सांगण्यात आले. दरम्यान, सर्वपक्षीय बैठकीत ममता बॅनर्जींच्या टीएमसीच्या नेत्यांकडून पुढील आठवड्यात सर्वपक्षीय शिष्टमंडळ मणिपूरला पाठवण्याची मागणी करण्यात आली. दुसरीकडे, या बैठकीत समाजवादी पक्षाने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.
या बैठकीला भाजपसह 18 राजकीय पक्ष आणि ईशान्येतील चार खासदार आणि ईशान्येचे दोन मुख्यमंत्री उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, सपा आणि आरजेडीने बैठकीत मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याचवेळी द्रमुकने महिला आयोगाच्या स्थापनेचा मुद्दा उपस्थित केला. त्याचबरोबर लोकांना वेगळे करण्यासाठी बळाचा वापर करू नये, अशी सूचना काँग्रेसने केली.
बैठकीनंतर गृह मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात अमित शाह म्हणाले की, मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी संवेदनशीलतेने आणि राजकीयदृष्ट्या त्यांच्या सूचना दिल्या आणि केंद्र सरकार या सूचनांचा खुल्या मनाने विचार करेल.
Mumbai Rain; पाणी साचल्याने अंधेरी मेट्रो बंद, पहिल्याच दिवशी मुंबईकरांची तारांबळ
खरे तर मणिपूरमध्ये 3 मे रोजी हिंसाचार सुरू झाल्यापासून विरोधक राज्यातील परिस्थितीवर सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. विरोधी पक्ष केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधत आहेत. काँग्रेससह 10 पक्ष मणिपूरवर सर्वपक्षीय बैठक घेण्याची मागणी अनेक दिवसांपासून करत होते. या पक्षांनी पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यापूर्वी भेटीची वेळ मागितली होती.
Forest Guard Recruitment 2023: वन विभागात हजारो पदांसाठी जागा, अंतिम तारीख संपण्यापूर्वी अर्ज करा
यानंतर सर्व पक्षांनी मिळून मणिपूरवर निवेदन दिले. या सगळ्या दरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधी पक्षांची बैठक बोलावली. बैठकीत गृहमंत्र्यांनी विरोधी पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले आणि मणिपूरमधील परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल असे आश्वासन दिले.