Download App

Manipur Violence : संतापाचा उद्रेक! व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जमावाने आरोपीचे घर जाळले

Manipur Violence : मागील तीन महिन्यांपासून मणिपुरात उसळलेला हिंसेचा आगडोंब अजूनही शांत झालेला नाही. त्यातच दोन महिलांची विवस्त्र धिंड काढली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे राज्यात पुन्हा तणाव निर्माण झाला असून महिलांवर अत्याचार करणाऱ्या मुख्य आरोपीचे घर संतापलेल्या जमावाने जाळून टाकले. ही घटना मणिपुरातील चेकमाई परिसरात घडली.

Manipur Violence : ‘महिलांच्या शोषणाची किंमत…’ मणिपूर घटनेवर आशुतोष राणांचं संतापजनक ट्विट…

मणिपुरात हिंसाचार उसळला त्यावेळच्या सुरुवातीच्या टप्प्यातील महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून संबंध देशभरातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेवरुन मणिपुरात तणाव पुन्हा वाढला आहे.

राज्यात ठिकठिकाणी निदर्शने सुरू झाली आहे. या घटनेचे पडसाद संसदेच्या अधिवेशनात उमटले असून विरोधी पक्षांनी सरकावर टीकेची झोड उठविली आहे. या घटनेवरून विरोधक संसदेत जोरदार आवाज उठवत आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधानांनी काल संसदेच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत या घटनेवर प्रचंड संताप व्यक्त केला. या घटनेत सहभागी असलेल्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचा इशाराही दिला.

विधीमंडळातही पडसाद

आज राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनातही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या. तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी अत्यंत कठोर शब्दांत या घटनेचा निषेध करत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

 

Tags

follow us