Manipur Violence : ‘महिलांच्या शोषणाची किंमत…’ मणिपूर घटनेवर आशुतोष राणांचं संतापजनक ट्विट…
Manipur Violence : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार, मीरा चोप्रानंतर आता प्रसिद्ध अभिनेते आशुतोष राणा यांनीही मणिपूरमधील महिलांच्या विवस्त्र व्हायरल व्हिडिओवर संतापजनक ट्विट केलं आहे. या ट्टिटमध्ये बोलताना त्यांनी इतिहास साक्षी आहे की ज्यावेळी महिलांचे शोषण करण्यात आले त्याची मोठी किंमत बाकीच्यांना चुकवावी लागली आहे. जे काही होतं आहे त्याचे आपल्याला काहीच का वाटत नसल्याचं म्हटलं आहे.
इतिहास साक्षी है जब भी किसी आतातायी ने स्त्री का हरण किया है या चीरहरण किया है उसकी क़ीमत संपूर्ण मनुष्य ज़ाति को चुकानी पड़ी है।
जैसे सत्य, तप, पवित्रता और दान ‘धर्म’ के चार चरण होते हैं वैसे ही ‘लोकतंत्र’ के भी विधायिका, कार्यपालिका, न्यायपालिका व पत्रकारिता रूपी चार चरण होते…
— Ashutosh Rana (@ranaashutosh10) July 20, 2023
तसेच मणिपूरमध्ये जे झाले ती संपूर्ण मानवतेला काळीमा फासणारी गोष्ट आहे. आपण अजूनही एक समाज म्हणून कशाप्रकारे जगतो आहोत याचा विचार करण्याची गरज असल्याचं राणा म्हणाले आहेत. दरम्यान, मणिपूर हिंसाचारानंतर विवस्त्र महिलांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातील सर्वच स्तरातील लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर या प्रकरणाचे थेट संसदेतही पडसाद उमटले आहे. या प्रकरणावरुन विरोधकांनी संसदेत मोठा गदारोळ केला आहे, त्यामुळे उद्यापर्यंत दोन्ही सभागृहाचं काम बंद ठेवण्यात आलं आहे.
‘शुभेच्छा शतकोटी, ‘अजित’ महाराष्ट्रासाठी’ : आणखी एका आमदाराने सोडली शरद पवारांची साथ?
तसेच घटनेचं गांभीर्यं लक्षात घेत आरोपींवर कडक कारवाई होणार असल्याचं आश्वासनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे. या घटनेनंतर प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली असून इतर आरोपींना लवकरात अटक करण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
या प्रकरणानंतर राजकीय नेत्यांसह, विविध क्षेत्रातील नागरिक आणि कलाकारांकडून संताप व्यक्त केल्याचं दिसून आलं आहे. सत्य, तप, पवित्रता आणि दान हे धर्माचे चार अंग आहेत. तसेच लोकशाहीचे देखील विधायक, कार्यपालिका, न्यायपालिका आणि पत्रकारिता हे चार स्तंभ आहेत. या प्रत्येकानं आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडण्याची गरज आहे. असे राणा यांनी म्हटलं आहे.