‘शुभेच्छा शतकोटी, ‘अजित’ महाराष्ट्रासाठी’ : आणखी एका आमदाराने सोडली शरद पवारांची साथ?

‘शुभेच्छा शतकोटी, ‘अजित’ महाराष्ट्रासाठी’ :  आणखी एका आमदाराने सोडली शरद पवारांची साथ?

पुणे : राष्ट्रवादीतील बंडानंतर हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या आमदारांनी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली. तर बहुसंख्य आमदारांनी मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. अशात आता हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनीही शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे का? असा सवाल सध्या विचारला जात आहे. पुणे शहरात लागलेल्या काही बॅनर्समुळे हा प्रश्न विचारला जात आहे. (Hadapsar MLA Chetan Tupe has also decided to leave Sharad Pawar and go with Ajit Pawar)

काय आहे या बॅनर्सवर?

अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर्स पुणे शहरात झळकले आहेत. यावर ‘शुभेच्छा शतकोटी ‘अजित’ महाराष्ट्रासाठी’ अशा आशयाचे बॅनर्स लावून अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. याबरोबरच या बॅनर्सवर चेतन तुपे, रुपाली पाटील, अप्पा सुरवसे आणि अभयशेठ मांढरे यांचे फोटो आहेत. रुपाली पाटील यांनी यापूर्वीच अजित पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या सर्वांसोबत चेतन तुपे यांचाही फोटो असल्याने आता तेही अजित पवार यांच्या गटात गेले आहेत का असा सवाल विचारला जात आहे.

शरद पवारांना राष्ट्रीय पातळीवर मोठा धक्का! नागालँडमधील सर्व आमदारांचा अजितदादांना पाठिंबा

राष्ट्रवादीतील बंडानंतर चेतन तुपेंनी अद्यापपर्यंत आपली भूमिका जाहीर केली नव्हती. प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात असल्याने ते पावसाळी अधिवेशनातही उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे ते नेमके कोणाच्या बाजूला बसतात हे कळून येऊ शकले नव्हते. मात्र 5 जुलैला शरद पवार यांच्या मेळाव्याला उपस्थित होते. त्यामुळे ते शरद पवार यांच्यासोबतच आहेत, असे सांगितले गेले. मात्र मेळाव्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांच्या भुमिकेबाबत सस्पेन्स निर्माण झाला होता.

लोकसभेत PM मोदींनी घेतली सोनिया गांधींची भेट; नेमकी या नेत्यांमध्ये काय चर्चा झाली?

राष्ट्रवादीचे पुणे जिल्ह्यात 21 पैकी दहा आमदार आहेत. त्यातील खुद्द अजित पवार हे एक आहेत. याशिवाय दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे, सुनील शेळके, सुनील टिंगरे, अण्णा बनसोडे, दिलीप मोहिते या राष्ट्रवादीच्या आमदारांनी बंडाच्या पहिल्या दिवसापासून अजित पवारांना साथ दिली आहे. तर जुन्नरचे आमदार अतुल बेनके आणि हडपसरचे आमदार चेतन तुपे हे दोघेही अद्याप तळ्यात मळ्यात आहेत. शिरूरचे आमदार अशोक पवार हेच एकमेव आमदार पहिल्या दिवसापासून शरद पवार यांच्यासोबत काय राहिले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube