शरद पवारांना राष्ट्रीय पातळीवर मोठा धक्का! नागालँडमधील सर्व आमदारांचा अजितदादांना पाठिंबा

शरद पवारांना राष्ट्रीय पातळीवर मोठा धक्का! नागालँडमधील सर्व आमदारांचा अजितदादांना पाठिंबा

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. नागालँडमधील (Nagaland) सर्व 7 आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पाठिंबा जाहीर केला आहे. एक पत्रक काढून या सर्व आमदारांनी आज (20 जुलै) त्यांची भूमिका जाहीर केली. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरही अजित पवार यांना समर्थन मिळालं असून राष्ट्रवादीत फूट अधिक मोठी झाली आहे. (All 7 MLAs in Nagaland have announced their support to Deputy Chief Minister Ajit Pawar)

काय म्हंटले आहे पत्रकात?

नागालँड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संपूर्ण राज्य कार्यकारिणी आणि जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनी सखोल चर्चा आणि विचारविनिमय केल्यानंतर, नागालँडमध्ये पक्ष मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अजितदादा पवार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री. प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. नागालँड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री. वानुंग ओडिओ यांना राज्याचा हा निर्णय राष्ट्रीय नेतृत्वाला कळविण्याचे अधिकार देण्यात आले आले आहेत.

NCP Nagaland

याबाबत माहिती देताना राष्ट्रीय प्रवक्ते व राष्ट्रीय सचिव श्री. ब्रजमोहन श्रीवास्तव म्हणाले की, आज प्रदेशाध्यक्ष श्री. वानुंग ओडिओ यांनी नवी दिल्लीत येऊन राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री.प्रफुल्ल पटेल आणि खासदार व प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र श्री.सुनील तटकरे यांची भेट घेतली व नागालँड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या निर्णयाची माहिती दिली व आमदारांसह सर्व पदाधिकार्‍यांना पाठिंबा देण्याचे प्रतिज्ञापत्र सुपूर्द केले.

मणिपूर हिंसाचार अन् महिलांच्या व्हिडिओ प्रकरणावर संसदेत गदारोळ, दोन्ही सभागृहाचं कामकाज तहकूब…

नागालँड युनिटच्या पाठिंब्याबद्दल आनंद व्यक्त करत प्रफुल्ल पटेल यांनी प्रदेशाध्यक्षांना मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले आणि पक्ष मजबूत करण्याच्या सूचनाही दिल्या. श्री ब्रजमोहन श्रीवास्तव यांनी सांगितले की राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री प्रफुल्ल पटेल यांनी नागालँड राज्य कार्यकारिणी आणि पूर्वी नियुक्त केलेल्या जिल्हा युनिट्सना नेहमीप्रमाणे काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube