Mann Ki Baat : येत्या 30 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या ‘मन की बात’ (Mann Ki Baat) या कार्यक्रमाचा 100 वा भाग रेडिओवर प्रसारित होणार आहे. या विशेष कामगिरीवर सरकारकडून 100 रुपयांचं नाणं (100 rupees coin
)जारी केलं जाणार आहे. या नाण्यावर मायक्रोफोनसह ‘मन की बात 100’ लिहिलेलं असणार आहे, आणि ते चार धातूंनी बनलेलं असणार आहे.
केजरीवालांच्या बंगल्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधींची उधळपट्टी; नुसते पडदेच 8 लाखांचे तर, फरश्या…
सरकारकडून जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटलंय की, मन की बातच्या 100 व्या भागाच्या प्रसारणानिमित्त टांकसाळीला 100 रुपयांची नाणी टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
100 व्या भागाच्या निमित्ताने दिल्लीच्या नॅशनल मीडिया सेंटरमध्ये केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मन की बात वर एक कॉन्क्लेव्ह आयोजित केली आहे. त्याचं उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या हस्ते होणार आहे.
100 रुपयांच्या नाण्याच्या विशेष गोष्टी
चांदी, तांबे, निकेल आणि जस्त या चार धातूंचे मिश्रण करून हे नाणे तयार केले जाणार आहे.
नाण्याची गोलाई 44 मिमी आणि वजन 35 ग्रॅम असेल.
नाण्यावर ₹ 100 चे चिन्ह आणि समोरच्या बाजूला अशोक स्तंभ चिन्ह असणार आहे. यासोबतच समोरच्या खालच्या भागात सत्यमेव जयते असणार आहे.
नाण्याच्या उलट बाजूवर मन की बातच्या 100 व्या भागाचा लोगो आणि मायक्रोफोनचा फोटो असेल. त्यावर 2023 देखील चिन्हांकित केले जाईल. यासोबतच ‘मन की बात 100’ हे हिंदी आणि इंग्रजीमध्ये लिहिले जाणार आहे.