ब्रेकिंग : दिल्लीतील ब्रम्हपुत्रा इमारतीला भीाषण आग; अनेक खासदारांची घरं; अग्निशमन दल घटनास्थळी

Fire breaks out at MP flats in Delhi या इमारतीत अनेक लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार राहतात. ही इमारत संसद भवनापासून फक्त 200 मीटर अंतरावर आहे.

ब्रेकिंग : दिल्लीतील ब्रम्हपुत्रा इमारतीला भीाषण आग; अनेक खासदारांची घरं; अग्निशमन दल घटनास्थळी

ब्रेकिंग : दिल्लीतील ब्रम्हपुत्रा इमारतीला भीाषण आग; अनेक खासदारांची घरं; अग्निशमन दल घटनास्थळी

Fire breaks out at MP flats in Delhi : दिल्लीतील डॉ. बिशंबर दास मार्गावरील ब्रह्मपुत्र अपार्टमेंट्समध्ये मोठी आग (Fire) लागली आहे. या इमारतीत अनेक लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार राहतात. ही इमारत संसद भवनापासून फक्त 200 मीटर अंतरावर आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. कोणतीही जीवितहानी झालेली नसून, दिवाळी असल्याने अनेक खासदार फ्लॅटमध्ये वास्तव्यास नव्हते त्यामुळे मोठी हानी टळली आहे.

समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार राज्यसभेचे खासदार अजित गोपछडे यांच्या फ्लॅटला आग लागल्याचे सांगितले जात आहे. तर,काही जणांकडून इमारतीच्या पार्किंगमध्ये आग लागली त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये आगीने रौद्ररूप धारण केलं. ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नसून, सध्या घटनास्थळीअग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.  ज्या इमारतीला ही आग लागली ती इमारत संसद भवनापासून (Parliament House) अवघ्या काही अंतरावर असून, या ठिकाणी अनेक खासदारांची घरे आहेत. राज्यसभेचे अनेक खासदार या इमारतीत वास्तव्यास आहेत. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 2020 मध्ये केले होते. Fire breaks out at MP flats in Delhi, several tenders on spot

30 मिनिटे अग्निशमन दल आलेच नाही

तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी सोशल मीडियावर या आगीविषयी पोस्ट केली आहे. ज्यात ते म्हणतात की, आग आटोक्यात आणण्यासाठी 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला. ज्यावेळी आग लागली त्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी वेळेत पोहोचल्या नाही, ज्यामुळे आग आणखी पसरली. आगीचं रौद्ररूप बघता येथील रहिवाशांमुळे चिंतेचे वातावरण होते.

घटनेची माहिती देताना, ब्रह्मपुत्र अपार्टमेंटमधील रहिवासी विनोद म्हणाले की, “…माझा कुत्रा आत अडकला होता. माझ्या मुलीचे काही महिन्यांत लग्न आहे, त्यासाठी आम्ही खरेदी केलेले सर्व दागिने, कपडे देखील आत आहेत… माझी पत्नी आणि माझे एक मूल जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विनोद यांचे घर इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आहे.

Exit mobile version