Download App

व्हीके सक्सेना मानहानी खटल्यात Medha Patkar दोषी; 24 वर्षांपुर्वीच्या प्रकरणात दिल्ली कोर्टाचा निकाल

Medha Patkar यांना दिल्ली न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. पाटकरांच्या विरोधात विनयकुमार सक्सेना यांनी 2001 मध्ये मानहानीचा खटला दाखल केला होता.

Medha Patkar Convicts in VK Suxena Defamation case : नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर ( Medha Patkar ) यांना दिल्ली न्यायालयाने 24 वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणामध्ये दोषी ( Convicts ) ठरवलं आहे. पाटकर यांच्या विरोधात विनयकुमार सक्सेना ( VK Suxena) यांनी 2001 मध्ये मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यावेळी ते अहमदाबादमधील एनजीओ नॅशनल फॉर सिव्हिल लिबर्टीचे प्रमुख होते. तर सक्सेना सध्या दिल्लीचे राज्यपाल आहेत.

Porsche Car Accident : अखेर पोलीस आयुक्तांना जाग, येरवड्याचे दोन अधिकारी निलंबित

मेधा पाटकर यांनी व्हीके सक्सेना यांच्यावर आपल्या आंदोलनाच्या विरोधात सक्सेना यांनी गुजरातच्या संसाधनांचा परकीय हितसंबंधासाठी वापर केल्याचा आरोप केला होता. त्या विरोधात सक्सेना यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता. मात्र पाटकर यांचे हे आरोप सक्सेना यांची केवळ प्रतिष्ठा खराब करण्यासाठी होते. हे सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने पाटकर यांना दोषी ठरवलं.
तसेच सक्सेना यांच्या बाजूने निकाल दिला आहे. यावर न्यायालयाने म्हटले की, पाटकर यांनी दंडनीय गुन्हा केला आहे. त्यामुळे त्या दोषी ठरतात. त्यांनी जाणून-बुजून सक्सेना यांची बदनामी केली. ज्यामुळे सक्सेना यांच्या प्रतिष्ठेला आणि विश्वासार्हतेला धोका निर्माण झाला आहे.

लोकसभेचे उमेदवार पाचवी, आठवी पास ! एडीआरचा डोळे उघडणारा रिपोर्ट

दरम्यान सक्सेना ज्यावेळी एनजीओचं काम करत होते. त्यावेळी पाटकर या नर्मदा बचाव आंदोलन चालू होतं. ज्याला सक्सेना यांनी कडाडून विरोध केला होता. याच प्रकरणात पाटकर यांनी आपल्या आंदोलनाच्या विरोधात सक्सेना यांनी जाहिराती प्रसिद्ध केल्याचा खटला दाखल केला होता. त्यावर सक्सेना यांनी माननीय खटला दाखल केला होता. मात्र आता तब्बल 24 वर्षानंतर या प्रकरणाचा न्यायालयाने निर्वाळा दिलेला आहे.

follow us

वेब स्टोरीज