लोकसभेचे उमेदवार पाचवी, आठवी पास ! एडीआरचा डोळे उघडणारा रिपोर्ट

  • Written By: Published:
लोकसभेचे उमेदवार पाचवी, आठवी पास ! एडीआरचा डोळे उघडणारा रिपोर्ट

Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरू आहे. पाच टप्प्यातील मतदान पार पडले आहे. तर सहाव्या टप्प्यातील मतदान शनिवारी (25 मे) रोजी होत आहे आणि सातव्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना आपले शिक्षण, संपत्ती, गुन्ह्यांची माहिती उमेदवारी अर्ज दाखल करताना जाहीर करावी लागते. त्यात देशातील राजकारणांचे शिक्षण आणि गुन्हे हे नेहमीच चर्चेचा विषय असते. निवडणुकीच्या काळात उमेदवारांचा अभ्यास करणाऱ्या एसोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (Association for Democratic Reforms) या संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.

एडीए संस्थेने लोकसभेची निवडणूक लढवत असलेल्या 8 हजार 360 उमेदवारांपैकी 8 हजार 337 उमेदवारांच्या शिक्षणाचा अभ्यास केला आहेत.
यात 121 उमेदवार हे शाळेत गेलेले नाहीत. ते अशिक्षित असल्याचे त्यांनी आपल्या उमेदवारी अर्जात म्हटले आहे. तर 359 उमेदवारांनी पाचवीपर्यंतच शिक्षण घेतलेले आहे. तर 647 उमेदवारांनी आपले शिक्षण आठवीपर्यंत झाल्याचे म्हटले आहे. तर 1 हजार 303 उमेदवारांनी स्वतःला बारावी उत्तीर्ण असल्याचे घोषित केले आहे. तर 1 हजार 502 उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण जाहीर केले आहे. तर पीएचडी करणारे 198 उमेदवारही रिंगणात आहेत.

राज्य सरकारची ‘ती’ मागणी योग्यच! शरद पवारांनी दिला सरकारला पाठिंबा


पहिल्या टप्प्यातील उमेदवार

पहिल्या टप्प्यात 639 उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता ही आठवी ते बारावी सांगितली आहे. तर 836 उमेदवारांनी आपले शिक्षण पदवीपर्यंत झाल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. तर 36 उमेदवारांनी स्वत: फक्त साक्षर म्हणून घोषित केले आहे. तर 26 ने अशिक्षित, तर चार जणांनी आपली शैक्षणिक पात्रता जाहीर केलेली नाही.

‘केजरीवाल अनुभवी चोर’ : दिल्लीच्या सीएमचा पीएम मोदींसह ईडी, सीबीआयवर हल्लाबोल


दुसऱ्या टप्प्यातील शिक्षित उमेदवार

दुसऱ्या टप्प्यातील मतदानात 533 उमेदवारांनी आपले शैक्षणिकस्तर पाचवी आणि बारावीपर्यंत दाखविले आहे. तर 574 उमेदवारांनी आपले शिक्षण पदवी व पदवीत्तर दाखविले आहे. तर 37 उमेदवार केवळ साक्षर असल्याचे म्हटले आहे. तर आठ जणांचे अशिक्षित असल्याचे म्हटले आहे. तर तीन जणांनी आपली शैक्षणिक योग्यता जाहीर केलेली नाही.

तिसऱ्या टप्प्यातील उमेदवार
तिसऱ्या टप्प्यात 639 उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रताही पाचवी आणि बारावीपर्यंत दाखविली आहे. तर 519 उमेदवारांनी पदवी आणि पदवीत्तर असे शिक्षण झाल्याचे जाहीर केले आहे. तर 56 उमेदवारांनी केवळ साक्षर, तर 19 उमेदवारांनी अशिक्षित असल्याचे जाहीर केले आहे. तर तीन उमेदवारांनी आपली शैक्षणिक माहितीचा खुलासा केलेला नाही.


चौथा आणि पाचवा टप्पा

चौथा टप्प्यात 644 उमेदवारांनी आपले शिक्षण हे पाचवी ते बारावीपर्यंत झाल्याचे जाहीर केले आहे. तर 944 जण हे पदवीधर आहेत. तर 30 उमेदवारांनी स्वताःला साक्षर घोषित केले आहे. तर 26 जणांनी अशिक्षित असल्याचे जाहीर केले. पाचव्या टप्प्यात 293 उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता ही पाचवी ते बारावीपर्यंत जाहीर केली आहे. तर 349 उमेदवार हे पदवीधर व पदवीत्तुर आहेत. तर 20 उमेदवार केवळ शिक्षित आहे. तर पाच अशिक्षित आहे. तर दोन उमेदवारांनी आपली शैक्षणिक योग्यता जाहीर केलेली नाही.


सहावा आणि सातवा टप्पा

सहाव्या टप्प्यातील 332 उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता पाचवी आणि बारावीपर्यंत घोषित केली आहे. 487 उमेदवारांनी पदवी प पदवीत्तर शिक्षण जाहीर केले आहे. 22 उमेदवार डिप्लोमाधारक आहे. तर बारा उमेदवार साक्षर आहेत. तर तेरा उमेदवार निरक्षर आहे. सातव्या टप्प्यातील 402 उमेदवारांनी आपली शैक्षणिक योग्यता पाचवी ते बारावीपर्यंत दाखविली आहे. तर 430 उमेदवार हे पदवीधर आहे. तर 26 जणांनी साक्षर म्हणून जाहीर केले आहेत. 24 उमेदवार अशिक्षित आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube