Download App

“हा शेवट नाही, आमचा लढा सुरुच राहणार” : सुप्रीम कोर्टाच्या निकालावर मेहबुबा मुफ्तींची नाराज

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करणे घटनात्मकदृष्ट्या वैध आहे, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. कलम 370 ही तात्पुरती तरतूद होती, युद्धजन्य परिस्थितीमध्ये ही तरतूद केली होती, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने मोदी सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला. दरम्यान, यावेळी जम्मू-काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करावा आणि 30 सप्टेंबर 2024 पर्यंत विधानसभेच्या निवडणुका घ्याव्यात, असे दोन मोठे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. (Mehbooba Mufti has given a disappointing reaction to the Supreme Court’s Jammu and Kashmir verdict)

Supreme Court चा निर्णय म्हणजे अखंड भारत…; कलम 370 वैध ठरल्यावर पंतप्रधानांची प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे देशातील भाजप आणि मित्रपक्षांनी जोरदार स्वागत केले आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही “हा निर्णय केवळ घटनात्मकच नाही तर तो एक आशेचा किरण आहे. उज्जल भविष्यासाठी एक अखंड भारत निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी केलेल्या सामुहिक संकल्पाचा दाखला आहे” अशी प्रतिक्रिया दिली. दुसऱ्या बाजूला जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. मात्र त्यांनी या निर्णायाला अत्यंत निराशजनक म्हंटले असून हा आयडिया ऑफ इंडियाचा पराभव आहे, असे त्या म्हणाल्या.

काय म्हणाल्या मेहबुबा मुफ्ती?

मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या, “या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरमधील जनता ना आशा सोडणार आहे आणि ना पराभव स्वीकारणार आहे. आमचा हा लढा कोणताही आदर आणि सन्मानाशिवायही सुरूच राहणार आहे. आमच्यासाठी हा शेवट किंवा अंतिम स्थान नसून एक थांबा आहे. जम्मू-काश्मीरने अनेक चढउतार पाहिले आहेत. आम्ही निराश होऊन पराभव स्वीकारावा अशी आमच्या विरोधकांची इच्छा आहे”

सिद्धरमय्यांची अवस्था ठाकरेंसारखी होणार! कर्नाटकात लवकरच 60 आमदारांसह ऑपरेशन लोटस

“सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, कलम 370 हे तात्पुरते आहे. त्यामुळेच ते हटवण्यात आले आहे. मात्र हा आमचा पराभव नसून, आयडिया ऑफ इंडियाचा पराभव आहे. त्यामुळे हिंमत हारू नका, ही वेळही निघून जाईल”, अशी आशा मुफ्ती यांनी व्यक्त केली.

“तुमच्यापैकी अनेकजण या निर्णयाचा आनंद साजरा करत असतील. पण आज जम्मू-काश्मीर पुन्हा तुरुंगात बदलले आहे. सर्व दुकानदारांना धमकावले जात आहे. त्यांना सकाळी 10 वाजण्यापूर्वी त्यांची दुकाने उघडण्यास सांगण्यात आले होते. आमच्यावरही पाळत ठेवण्यात आली होती. मात्र, यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही, असा विश्वासही मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीरमधील जनतेला दिला.

Tags

follow us