सिद्धरमय्यांची अवस्था ठाकरेंसारखी होणार! कर्नाटकात लवकरच 60 आमदारांसह ऑपरेशन लोटस
हसन : कर्नाटकातील काँग्रेस सरकारमध्ये अंतर्गत कलह शिगेला पोहोचला असून सिद्धरामय्यांचे सरकार (siddharamaiah government)कधीही पडू शकते. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) ज्या परिस्थितीला सामोरे जावे लागले, त्याच स्थितीचा सामना कर्नाटकात काँग्रेस पक्षाला करावा लागू शकतो, असे खबळजनक दावे जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष) नेते आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी केले आहेत. हसनमध्ये पत्रकारांना संबोधित करताना ते बोलत होते. (Janata Party (Secular) leader and former Chief Minister HD Kumaraswamy claimed that Operation Lotus would soon take place in Karnataka)
एचडी कुमारस्वामी म्हणाले, ‘सिद्धरामय्यांचे सरकार पाच वर्षे टिकणार नाही. मे 2024 नंतर हे सरकार पडणार हे निश्चित आहे. हे सरकार कोणत्याही किंमतीत टिकणार नाही. याच कारण काँग्रेसचे एक प्रमुख मंत्री केंद्रीय यंत्रणांकडून चौकशीला सामोरे जात आहेत. कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी ते भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहेत. सध्या त्यांची भाजप नेत्यांशी चर्चा सुरू असून पक्ष बदलाच्या प्रक्रियेत ते 50 ते 60 आमदारांना सोबत आणू शकतात, असा दावाही त्यांनी केला.
लोकसभेसोबत वाजणार जम्मू-कश्मीर निवडणुकांचे बिगुल? सुप्रीम कोर्टाचे दोन मोठे निर्देश
यायवेळी पत्रकारांनी कुमारस्वामी यांना ‘त्या’ काँग्रेसच्या मंत्र्याचे नाव विचारले. त्यावेळी मंत्र्याची ओळख न सांगता ते म्हणाले, असे धाडसी पाऊल केवळ प्रभावशाली व्यक्तीच उचलू शकतात आणि कोणताही छोटा नेता हे करू शकत नाही. आजचे राजकीय वातावरण खूपच अनाकलनीय आहे. काहीही होऊ शकते. प्रामाणिकपणा आणि निष्ठा कोणामध्येच उरलेली नाही. आज ते इथे आहेत आणि उद्या ते दुसरीकडे कुठेतरी उडी मारतील. देशाच्या सध्याच्या राजकारणाची ही खेदजनक अवस्था आहे.
मोठी बातमी : मोदी सरकारच्या निर्णयावर ‘सर्वोच्च’ मोहर, कलम 370 हटवणे योग्यच
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या ताकदीवर साशंकता आहे
यंदा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 135 जागा जिंकल्या असूनही, कुमारस्वामी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसबद्दल शंका असल्याचे मत व्यक्त केले. सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणाचा दाखला देत त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर जात जनगणनेच्या नावाखाली ‘जातीच्या आधारे लोकांमध्ये फूट पाडण्याचा’ प्रयत्न केल्याचाही आरोप केला. यावेळी अल्पसंख्याकांच्या विकासासाठी सिद्धरामय्या यांनी 10,000 कोटी रुपयांच्या केलेल्या घोषणेवरही त्यांनी टीका केली. ‘मी मुस्लिमांसाठी निधी देण्याच्या विरोधात नाही, पण हिंदूंचे काय? सर्वच हिंदू उच्च जातीतून आलेले नाहीत. दलित आणि गरीब हिंदूही आहेत. त्यांच्यासाठी काय तरतुदी केल्या जात आहेत? असा सवाल कुमारस्वामी यांनी केला.