Download App

शेतकऱ्यांना दिलासा, यंदा धो धो कोसळणार पाऊस, हवामान विभागाने दिली आनंदाची बातमी

IMD Monsoon 2025 Predicts :  भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदा देशात सरासरी पेक्षा जास्त पाऊसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने

  • Written By: Last Updated:

IMD Monsoon 2025 Predictions :  भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदा देशात सरासरी पेक्षा जास्त पाऊसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 2025 मध्ये 105 टक्के पावसाचा अंदाज आहे. तसेच यावेळी 1 जूनच्या सुमारास केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता देखील भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन (M. Ravichandran) यांनी मंगळवारी सांगितले की, दीर्घकालीन हवामान अंदाजानुसार, यावर्षी मान्सूनचा पाऊस सरासरीच्या 105% पर्यंत असू शकतो. भारतीय हवामान विभागानुसार या वर्षीच्या अंदाजानुसार काही प्रदेश वगळता देशातील बहुतेक भागांना अनुकूल पावसाच्या परिस्थितीचा फायदा होण्याची शक्यता आहे.

चार महिन्यांच्या मान्सून हंगामात लडाख, ईशान्य आणि तामिळनाडूमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. तर दुसरीकडे आयएमडीने संपूर्ण हंगामात एल निनो परिस्थितीची शक्यता नाकारली आहे. त्यामुळे यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा (Mrityunjay Mahapatra) यांनी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत दिली.

एल निनोची शक्यता कमी

भारतीय उपखंडात सामान्यपेक्षा कमी मान्सून पावसाशी संबंधित एल निनोसारखी परिस्थिती यावेळी निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. देशातील मान्सून साधारणपणे 1 जूनच्या सुमारास केरळमध्ये येतो. त्यानंतर, तो पुढे सरकतो आणि देशभर पसरतो. त्यानंतर सप्टेंबरच्या मध्यात मान्सून माघार घेऊ लागतो.

शेड्यूल फिक्स, बांगलादेशमध्ये पहिल्यांदाच भारत खेळणार टी-20 मालिका, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

तर दुसरीकडे एप्रिल ते जून दरम्यान अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता असल्याची माहिती देखील त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली. तसेच या कालावधीत देशातील काही भागात दुष्काळ पडण्याची देखील शक्यता असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

follow us