Download App

केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय; सशस्त्र पोलीस दलाची परीक्षा मराठीसह 13 भाषांमध्ये देता येणार

  • Written By: Last Updated:

CAPF Exams Held In 13 Regional Languages : केंद्रीय गृहमंत्रालयाने एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सशस्त्र पोलीस दल म्हणजेच केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांसाठी (CAPFs) हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आता CAPFs ची परीक्षा हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये देता येणार आहे.

CAPF मध्ये स्थानिक तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या पुढाकाराने हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. CAPF मध्ये हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, प्रश्नपत्रिका 13 प्रादेशिक भाषांमध्ये देखील तयार केली जाणार आहे.

Sanjay Raut : नागपूरच्या वज्रमूठ सभेत अजित पवारांना डावललं? राऊत स्पष्टच बोलले

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, प्रादेशिक भाषांमध्ये आसामी, बंगाली, गुजराती, मराठी, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगू, ओडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी आणि कोकणी यांचा समावेश असणार आहे. या निर्णयामुळे लाखो उमेदवार CAPF च्या परीक्षेत त्यांच्या मातृभाषा/प्रादेशिक भाषेतून परीक्षा देऊ शकणार आहेत. या कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) ही स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे घेतली जाणारी एक प्रमुख परीक्षा आहे, ज्यामध्ये देशभरातून लाखो उमेदवार सहभागी होतात. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, ही परीक्षा 01 जानेवारी 2024 पासून 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जाणार आहे.

Tags

follow us