Sanjay Raut : नागपूरच्या वज्रमूठ सभेत अजित पवारांना डावललं? राऊत स्पष्टच बोलले
Sanjay Raut On Ajit Pawar : महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना सरकार विरोधात महाविकास आघाडीकडून राज्यभरात सभा आयोजित केल्या जात आहेत. राज्यभरात महाविकास आघाडीकडून 16 सभा घेतल्या जाणार आहेत. त्यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. त्यानंतर आता नागपूरमध्ये सभा घेतली जाणार आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कंबर कसली असून उद्या रविवार, 16 एप्रिलला ही सभा होणार असून यासाठी आजच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नागपूरमध्ये दाखल झाले आहेत.
यावेळी संजय राऊतांना महाविकास आघाडीच्या नागपूरातील सभेला राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपस्थित राहणार का? असा प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, ‘माझ्या महिती प्रमाणे अजित पवार उद्या येणार आहेत. तर महाविकास आघाडीचे प्रत्येकी दोन नेते सभेमध्ये बोलतील असं सुत्र या सभांचं ठरलेलं आहे.’
‘एक प्रमुख नेता आणि एक स्थानिक नेता. तर राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि अनिल देशमुख असणार आहेत. त्यामुळे त्यांची भाषणं होऊ शकतात बाकी त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे.’ असं देखील ते म्हटले आहे. त्यामुळे नागपूरातील सभेला राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपस्थित राहणार का? आणि त्यांना भाषणाची संधी दिली जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Sujay Vikhe vs Nilesh Lanke : लोकसभा निवडणुकीआधीच दोघे आले आमनेसामने
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यामध्ये मतभेद आहेत. त्यामुळे अजित पवार हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजप बरोबर जॉईन होणार आहे. त्यासाठी भाजपकडून ईडी, सीबीआयचा वापर करून अजित पवार यांच्यावर दबाव आणला जात आहे. अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.