Download App

Instagram: भारतात इंस्टाग्राम झालं डाऊन; लाखो वापरकर्त्यांची तक्रार, नेमकं काय आहे कारण?

आपल्या सोशल मीडिया खात्यांवर इंस्टाग्राम न चालण्याबाबतच्या तक्रारी व्यक्त केल्या आहेत. सध्या हा प्रॉब्लेम फक्त भारतात आहे

  • Written By: Last Updated:

Instagram down : आज सकाळपासून भारतातील लाखो इंस्टाग्राम वापरकर्त्यांनी अ‍ॅप चालू करण्यात येणाऱ्या अडचणींची तक्रार केली आहे. Downdetector, ही आउटेज ट्रॅकिंग प्लॅटफॉर्मने दिलेल्या माहितीनुसार, साधारणपणे सकाळी 11.15 वाजता या समस्या मोठ्या प्रमाणात आढळू लागल्या. इंस्टाग्राम वापरकर्त्यांना अ‍ॅपमध्ये लॉगिन करण्यास त्रास होत आहे. (Instagram) तसंच, काही वापरकर्त्यांनी फीड रिफ्रेश होण्यात अडचणी जाणवल्या आहेत.

Election Result LIVE : हरियाणात उलटफेर, भाजपाची मुसंडी; जम्मूत भाजपचा पहिला विजय

अनेक वापरकर्त्यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यांवर इंस्टाग्राम न चालण्याबाबतच्या तक्रारी व्यक्त केल्या आहेत. सध्या हा प्रॉब्लेम फक्त भारतात आहे की अन्य देशांमध्येही अशी परिस्थिती आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

इंस्टाग्रामकडून अजूनही या समस्येवर कोणतेही अधिकृत माहिती आलेली नाही. मात्र, तांत्रिक गडबडीमुळे ही समस्या निर्माण झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. Downdetector च्या डेटानुसार, हा आउटेज भारतातील अनेक प्रमुख शहरांमध्ये पाहिला जात आहे. जसजसा वेळ जात आहे तसतसे इंस्टाग्रामची सेवा कधी पूर्ववत होईल याकडे सर्वांचंलक्ष लागलेलं आहे.

follow us