सरकार आल्यानंतर सर्वच अधिकारी संघाचे झाले; भाजप मंत्र्यांचे भुवया उंचावणारे विधान

Kailash Vijayvargiya -सरकार सत्तेत आल्यानंतर सगळेच संघाचे झाले. प्रत्येक अधिकारी संघाचा झाला. 'माझे वडील शाखेत जात होते,' असेही अनेक जण सांगू लागले.

Rss

Rss

Kailash Vijayvargiya On RSS : आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी अलीकडेच एका हिंदू संमेलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्या संस्थापकांबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. विशेष म्हणजे नांगरे पाटील यांची नागपूरचे पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झालेली आहे. त्यावरून राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर नांगरे पाटील यांचे कान टोचले आहेत. त्याच आता मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री आणि भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय (Kailash Vijayvargiya) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि सरकारी अधिकाऱ्यांबाबत एक मोठे विधान केले आहेत. संघाचा विस्तार होत असला तरी चांगल्या माणसांची कमतरता जाणवत असल्याचे मत विजयवर्गीय यांनी सांगितले होते.

भोपाळ येथील मानस भवनात आयोजित श्री शालिग्राम तोमर स्मृती राष्ट्रसेवी सन्मान सोहळ्यात मंत्री विजयवर्गीय पाहुणे होते. विजयवर्गीय म्हणाले, आपले सरकार सत्तेत आल्यानंतर एखादा अधिकारी येतो आणि म्हणतो, ‘सर, मी शाहजहानपूरला असताना शाखेत जात होतो. अरे भाऊ, तुम्ही आता जाता, पण आमचे सरकार येण्यापूर्वी कधी सांगितले नव्हते. प्रत्येक अधिकाऱ्याच्या मनात काही ना काही असते की, ‘मीही संघाचा बेल्ट घातला आहे’ हे दाखवावे. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी असेच विचार करतो. सरकार सत्तेत आल्यानंतर सगळेच संघाचे झाले. प्रत्येक अधिकारी संघाचा झाला. ‘माझे वडील शाखेत जात होते,’ असेही अनेक जण सांगू लागले.

एक अधिकाऱ्याने तर त्याचे वडील शाखेचे अध्यक्ष होते, असे सांगितले. प्रत्यक्षात शाखेत असे कोणतेही पद नसते. संघात आज मोठी गर्दी झाली आहे, पण त्या गर्दीत चांगल्या माणसांची कमतरता जाणवते. शालिग्रामजी, देवधरजी आणि सदाशिवजी यांसारखे चांगले लोक आता दुर्मिळ झाले आहेत. संघटना वाढत आहे, विचारधाराही वाढत असल्याचे सांगितले जाते. मात्र, चांगले माणसेच नसतील तर त्या विचारधारेचे महत्त्व काय? यावर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असा सल्लाही मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी दिले आहेत.

Exit mobile version