Minister Nitin Gadkari : माझ्या बुद्धिची महिन्याची किंमत 200 कोटी रुपये आहे, पैशांसाठी मी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) म्हणाले आहेत. नागपुरात अॅग्रीकॉस वेलफेअर सोसायटीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
सध्या इथेनॉल ब्लेंज फ्यूलची सर्वत्र चर्चा सुरु आहे. सरकारने आता सर्वच पेट्रोल पंपांवर इथेनॉलचा समावेश असणारे पेट्रोल विकणे अनिवार्य केले आहे. सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला जात असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही टीका केली जात आहे. त्यावर बोलताना गडकरी यांनी ही प्रतिक्रिया दिलीयं.
पाकिस्तान विरुद्ध सामन्याआधी टीम इंडियाला धक्का, शुभमन गिलला दुखापत; नक्की काय घडलं?
पुढे बोलताना गडकरी म्हणाले, मी हे सगळं पैशांसाठी करतोयं, असं तुम्हाला वाटतंय का…इमानदारीने कसे पैसे कमवायचे हे मला चांगलंच माहिती आहे. विदर्भात साधारण 10 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही लाजिरवाणी बाब असून देशातला शेतकरी समृद्ध होत नाही तोपर्यंत आमचे प्रयत्न चालूच राहणार असल्याचं गडकरींनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, पेट्रोल पंपावर इथेनॉल ब्लेंड फ्यूल अनिवार्य करण्याच्या निर्णय घेण्यात आला. त्यानंतर या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. ही याचिका न्यायालयाने 1 सप्टेंबर रोजी फेटाळली. याचिका इथेनॉलमिश्रित पेट्रोलच्या विरोधात नाही. ग्राहकाच्या आवडीचा अधिकार शाबूत रहावा यासाठी ही याचिका दाखल करण्यात आल्याचं याचिकाकर्ते अक्षय मल्होत्रा यांचे वकील शादान फरासत यांनी सांगितलं.
“गद्दारांना धडा शिकवणार, बेईमानांना माफी नाही”, लंकेंनी फुंकले ‘झेडपी’ निवडणुकीचे रणशिंग
E20 पेट्रोल हे 2023 सालानंतर निर्मित करण्यात आलेल्या वाहनांसाठी अनुकूल आहे. त्यानंतरच्या वाहनांचे यामुळे नुकसान होईल, असा दावा याचिकेत करण्यात आला होता.
दरम्यान, समाजातल्या गरीब माणसाची सेवा करत राहिलो पाहिजे. आपल्याला राजकारणामध्ये मत मिळत राहतात. प्रत्येक राजकारणी हा पुढच्या निवडणुकीबद्दल विचार करतो तर प्रत्येक समाजसेवक हा पुढच्या समाजाच्या घटकाबद्दल विचार करतो त्यामुळे आपला जॉब हा थँकलेस असल्याचंही ते म्हणाले आहेत.
मी मराठवाड्यातून हेलिकॉप्टरने लातूरला की, गणपतराव देशमुख मला नेहमी भेटायचे दादांना माहिती आहे. मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा 50% पेक्षा जास्त काम झाले. जी दहा-दहा बारा-बारा वर्षांपासून बंद पडली होती. शेतकऱ्यांसाठी मी बळीराजा योजना काढली आणि केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला आठ हजार कोटी रुपये दिले. आणि प्रधानमंत्री सिंचन योजना करता 6000 कोटी दिले असल्याचंही ते म्हणाले आहेत.