Ram Mohan Naidu On Ahmedabad Air India Plane Crash : अहमदाबादमधील (Ahmedabad) एअर इंडिया विमान अपघात चौकशी ब्युरो ऑफ इंडिया (AAIB) चा सुरुवातीचा अहवाल आला आहे. यावर केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांची पहिली प्रतिक्रिया (Air India Plane Crash) समोर आलीय. त्यांनी सांगितलं की आम्ही AAIB शी समन्वय साधत आहोत, जेणेकरून त्यांना मदत मिळू शकेल. आम्ही मंत्रालयात या अहवालाचे विश्लेषण करत आहोत. त्याचा अंतिम अहवाल देखील लवकरच येईल, जेणेकरून निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल असं नायडू यांनी (Minister Ram Mohan Naidu) म्हटलंय.
वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना राम मोहन नायडू म्हणाले, माझा विश्वास आहे की, आपल्याकडे वैमानिक आणि क्रू मेंबर्सच्या बाबतीत जगातील सर्वात आश्चर्यकारक कर्मचारी संख्या आहे. वैमानिक आणि क्रू मेंबर्स हे विमान वाहतूक उद्योगाचा (Ahmedabad Plane Crash) कणा आहेत.
डॅशिंग कंगनाला आलाय खासदारकीचा कंटाळा; म्हणाली, “मला खरंच माहित नव्हतं की..”
एएआयबीच्या अहवालात काय आहे?
इंडियन एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) च्या सुरुवातीच्या अहवालात असं दिसून आलंय की, एअर इंडियाचे विमान टेकऑफनंतर फक्त 30 सेकंदांसाठी आकाशात राहू शकले. दोन्ही इंजिनचे इंधन कटऑफ स्विच ‘RUN’ वरून ‘CUTOFF’ वर गेले. याचा अर्थ इंजिनला इंधन मिळणे बंद झाले. जेव्हा इंधन इंजिनपर्यंत पोहोचले नाही, तेव्हा त्याला वीज मिळणे बंद झाले आणि विमान कोसळले.
RAT काम करत नव्हते…
उड्डाणानंतर काही सेकंदातच दोन्ही इंजिन बंद पडले, ज्यामुळे ते आवश्यक असलेली शक्ती मिळवू शकले नाही. यानंतर, विमानाला आपत्कालीन शक्तीची आवश्यकता असल्याची सूचना देणारे राम एअर टर्बाइन (RAT) कमी उंचीमुळे काम करू शकले नाही. जरी यानंतर पायलटने इंजिन सुरू करण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता.